November 8, 2025 2:55 PM November 8, 2025 2:55 PM

views 26

छत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यात ७ माओवाद्यांनी शरणागती पत्करली

छत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यात ७ माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. रायपूरचे पोलीस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांच्या समोर आज या ७ जणांनी ६ शस्त्रं खाली ठेवली. त्यांच्यावर एकूण ३७ लाख रुपयांची बक्षिसं जाहीर झाली होती. झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात दाट सारंडा जंगलात माओवादी बंडखोरांशी झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांना नक्षलविरोधी मोहिमेतलं मोठं यश मिळालं आहे.   झारखंड पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलांच्या संयुक्त पथकाची काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत जराईकेला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ...

October 8, 2025 7:48 PM October 8, 2025 7:48 PM

views 17

छत्तीसगढमध्ये १६ माओवादी शरण

छत्तीसगढच्या नारायणपूर जिल्ह्यात आज १६ माओवाद्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. यात  ७ महिलांचा समावेश आहे. शरणागत माओवाद्यांवर एकत्रितपणे सुमारे ३८ लाखांचं बक्षीस सरकारनं ठेवलं  होतं. राज्य सरकारच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत यापैकी प्रत्येकाला ५० हजार रुपयांचा धनादेशदेण्यात आला. गेल्या २० महिन्यात १८ शे माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे.

March 29, 2025 7:38 PM March 29, 2025 7:38 PM

views 20

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत १७ नक्षली ठार

छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत १७ नक्षली ठार झाले. यामध्ये ११ महिलांचा  समावेश आहे.  केरलापार पोलीस स्थानकाच्या हद्दीतल्या जंगलात जिल्हा राखीव दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकानं काल रात्री नक्षली विरोधी  मोहीम राबवली होती. या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाचे दोन जवान किरकोळ जखमी झाले. ठार झालेल्यांपैकी एकाची ओळख पटली असून, त्याचं नाव जगदीश उर्फ बुधरा असं आहे. पोलिसांनी त्याच्यावर २५ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.    घटनास्थळावरून पोल...

March 23, 2025 8:07 PM March 23, 2025 8:07 PM

views 15

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातल्या २२ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात आज २२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यात दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. या सर्वांवर मिळून एकूण ११ लाख रुपयांचं बक्षीस होतं. छत्तीसगड सरकारच्या धोरणानुसार या नक्षलवाद्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली.

March 15, 2025 9:09 PM March 15, 2025 9:09 PM

views 11

तेलंगणामध्ये ६४ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

तेलंगणा मध्ये बंदी घातलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी- माओवादी या संघटनेच्या ६४ सदस्यांनी आज भद्रादि कोठागुडम जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यात ४८ पुरुष तर १६ महिला माओवाद्यांचा समावेश आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यात आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची संख्या १२२ वर पोहोचली आहे. 

January 12, 2025 1:45 PM January 12, 2025 1:45 PM

views 41

छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन माओवादी

छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले. बिजापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रीय उद्यानात माओवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यावर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनं शोध मोहिम राबवली. या अभियानात मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा हस्तगत करण्यात आला असून यात स्वयंचलित शस्त्रास्त्रांचाही समावेश आहे. या विभागात शोध अभियान अजूनही सुरु आहे.