August 11, 2025 7:06 PM August 11, 2025 7:06 PM

views 22

राज्यातला मुख्य शासकीय सोहळा १५ ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्रालयात होणार

भारताच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणारा राज्यातला मुख्य शासकीय सोहळा १५ ऑगस्ट रोजी मुंबई इथे मंत्रालयात होणार आहे. सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पुणे इथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. ठाणे इथे जिल्हा मुख्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर बीड इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. नाशिक इथे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते तर रायगड जिल्ह्...

June 3, 2025 7:37 PM June 3, 2025 7:37 PM

views 20

राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; पदनिर्मिती, जागा आणि अनुषांगिक खर्चासाठी चार कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. आयोगासाठी पदनिर्मिती, जागा आणि अनुषांगिक खर्चालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. केंद्रीय स्तरावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग आहेत. या दोन्ही आयोगांशी निगडीत विषय वेगेवगळे असल्यामुळे दोन स्वतंत्र आयोग असणं आवश्यक आहे. त्यामुळे ५१ व्या जनजाती सल्लागार परिषदेत राज्यात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याची शिफारस करण्यात आल...

March 27, 2025 7:23 PM March 27, 2025 7:23 PM

views 10

मंत्रालयात ‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे मिळणार प्रवेश !

मंत्रालयात अभ्यागतांना यापुढे कोणत्याही कामासाठी ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात मिळणार आहे. ‘डिजीप्रवेश’ ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यावर सुरूवातीला केवळ एकदाच नोंदणी करावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारीत यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर, ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश घेता येईल. या संपूर्ण प्रक्रियेला तीन मिनीटांपेक्षा कमी कालावधी लागतो.    अशिक्षीत तसेच स्मार्टफोन नसलेल्या अभ्यागतांसाठी गार्ड...

January 2, 2025 7:03 PM January 2, 2025 7:03 PM

views 12

मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करण्यासाठी AIचा उपयोग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मंत्रालयात येणारे नागरिक, मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षाही भक्कम रहावी, यासाठी कृत्रिम बुद्धमतेचा उपयोग करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत. मंत्रालयात प्रत्येक मजल्यावर सुरक्षा जाळीचं काम पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.