November 8, 2025 3:16 PM November 8, 2025 3:16 PM

views 27

गडचिरोलीला महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील

गडचिरोलीचा उल्लेख महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्यसरकार प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं रुबी हॉस्पीटल अँड वेलनेस रुग्णालय आणि महाविद्यालय संकुलाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण आरोग्याचा अधिकार असून गडचिरोली सारख्या भागात देखील आरोग्यसेवा पोहोचत आहेत, जिल्ह्याचं चित्र बदलत आहे, असं ते म्हणाले.   राज्य सरकारनं ...

September 9, 2025 3:10 PM September 9, 2025 3:10 PM

views 7

उपसा जलसिंचन योजनांसाठीच्या वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

उपसा जलसिंचन योजनांसाठीच्या वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला.   अतिउच्चदाब, उच्चदाब, आणि लघुदाब उपसा जलसिंचन, अशा सर्व प्रकारच्या १ हजार ७८९ योजनांना वीज दरात सवलत मिळत असल्यानं या मुदतवाढीचा लाभ सर्व शेतकरी सभासदांना होणार आहे.    नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात  हुडकोकडून २ हजार कोटी रुपयांचं कर्ज घ्यायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.