October 12, 2025 11:56 AM October 12, 2025 11:56 AM

views 14

दिल्ली हाफ मॅराथॉन स्पर्धेत ४० हजार ५०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय आणि भारतीयस्पर्धक सहभागी

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी काही वेळापूर्वी दिल्ली हाफ मॅराथॉनला हिरवा झेंडा दाखवत प्रारंभ केला आहे. आशियातल्या या प्रमुख स्पर्धेत ४० हजार ५०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय आणि भारतीयस्पर्धक सहभागी होत आहे. यंदाच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये तिन्ही संरक्षण दल सहभागी होत आहेत.

August 8, 2024 7:11 PM August 8, 2024 7:11 PM

views 40

२०३६च्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात आयोजित करण्यासाठी भारताचे प्रयत्न

२०३६च्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात आयोजित करण्याबाबत भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं ऑलिंपिकचे भविष्यातले यजमान ठरवणाऱ्या समितीसोबत संवाद सुरू केला आहे. राज्यसभेत युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली. देशात विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यासाठी क्रीडा पायाभूत सुविधा वाढवणे ही एक सतत प्रक्रिया असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे..