September 17, 2024 6:50 PM September 17, 2024 6:50 PM

views 8

गेल्या १०० दिवसात सरकारकडून ९ पायाभूत सुविधा प्रकल्प मंजूर

गेल्या १०० दिवसात सरकारनं ९ पायाभूत सुविधा प्रकल्प मंजूर केले. त्यामुळे ११ कोटी मनुष्यदिवस इतकी रोजगारनिर्मिती होणार असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविय यांनी सांगितलं. केंद्रीकृत निवृत्तीवेतन, व्यवस्थेअतंर्गत येत्या १ जानेवारीपासून निवृत्त कर्माचाऱ्यांना त्यांच्या जवळच्या बँकेतून निवृत्ती वेतन मिळणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

July 19, 2024 2:58 PM July 19, 2024 2:58 PM

views 6

कीर्ति या केंद्र सरकारच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याच उद्घाटन मानसुख मांडविय यांच्या हस्ते होणार

केंद्र सरकारच्या कीर्ती अर्थात खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं होणार आहे.   तळागाळातल्या प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कीर्ती हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. उपक्रमाचा पहिला टप्पा चंदिगड इथं सुरू झाला. या टप्प्यात ३ लाख ६२ हजार ६८३ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यात तिरंदाजी, ऍथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉ...

June 29, 2024 10:03 AM June 29, 2024 10:03 AM

views 10

योगाचा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्याचा निर्णय – मनसुख मांडवीय

योगाचा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्याच्या निर्णयाचं केंद्रिय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी स्वागत केलं आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष डॉक्टर पी टी उषा यांनी हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातलं पत्र त्यांनी आशियाई ऑलिम्पिक मंडळाचे अध्यक्ष राजा रणधीर सिंग यांना नुकतंच पाठवलं आहे.