July 30, 2025 3:59 PM July 30, 2025 3:59 PM

views 6

ऑपरेशन सिंदूरवर राज्यसभेत आजही चर्चा सुरु

राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर आजही चर्चा सुरु राहिली. या चर्चेत परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी सांगितलं की, पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यात निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. त्यावर केंद्रसरकारने पाकिस्तानविरोधात कठोर धोरण घेतलं आहे. दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधू पाणीवाटप कराराला स्थगिती देण्यात आली. आणि पाकिस्तानातले दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. १९४७ नंतर सातत्याने पाकिस्तान भारत विरोधी दहशतवादी कारवायांना पाठबळ देत आहे. याआधी...

July 29, 2025 4:09 PM July 29, 2025 4:09 PM

views 4

सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्यामुळे पहलगाम हल्ला झाल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी अनेक गोष्टी नमूद केल्या, मात्र २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये हल्ला का आणि कसा झाला, याचं उत्तर मिळालं नाही, असं काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी नमूद केलं. पहलगाममध्ये इतके पर्यटक येतात, तिथं सुरक्षादलं का नव्हती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या हल्ल्यामागे असलेल्या टीआरएफ या दहशतवादी संघटनेने २०२० ते २०२५ या काळात काश्मीरमध्ये २५ दहशतवादी हल्ले केले, मात्र भारत सरकारने या संघटनेचा समावेश दहशतवादी संघटनांच्या यादीत २०२३मध्ये केला, यामागची कारणं काय, असंही...

July 21, 2025 8:13 PM July 21, 2025 8:13 PM

views 12

संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब, लॅडिंग विधेयक २०२५ ला मंजुरी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी चर्चा करावी या मागणीसाठी विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहात  सरकारला घेरत घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही  सभागृहाचं कामकाज तीनवेळा काही काळासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.     पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तात्काळ चर्चा घ्यावी अशी मागणी विरोधी पक्ष दिवसाच्या सुरुवातीपासून करत होते. लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब झाल्यानंतर दुपारी बारा वाजता कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणा...

July 17, 2025 5:09 PM July 17, 2025 5:09 PM

views 11

येत्या चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील-एकनाथ शिंदे

पंढरपूर इथला सुधारित तीर्थक्षेत्र आराखडा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात येतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य हेमंत रासने यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. या आराखड्याअंतर्गत पंढरपुरातल्या सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरं देण्यात येणार असून, यासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील असंही पवार यांनी सांगितलं. राज्य उत्पादन शुल्क विभागात सध्या सुरु असणाऱ्या भरती प्रक्रियेत बदल करण्याबाबत विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन निर्...

July 10, 2025 8:56 PM July 10, 2025 8:56 PM

views 98

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विधानसभेत सादर

देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षिततेसाठी आणि राज्यघटनेच्या विरोधात जाणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक आणलं असून याचा उद्देश कोणालाही त्रास देण्याचा नाही, याचा दुरुपयोग करायची मुभा कोणालाही मिळणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक मांडल्यानंतर त्यामागची सरकारची भूमिका त्यांनी मांडली. एकीकडे सशस्त्र माओवाद संपत असताना दुसरीकडे शहरी नक्षलवाद बोकाळत असून त्याला आळा घालण्यासाठी अशा प्रकारचा कायदा करण्याची सूचना...

July 10, 2025 9:02 PM July 10, 2025 9:02 PM

views 6

विधेयकातल्या कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना या शब्दाला विरोधकांचा आक्षेप

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान आमदार रोहित पवार यांनी या विधेयकातल्या 'कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना' या शब्दांवर आक्षेप घेत, कडवी उजवी विचारसरणी नसते का, असा सवाल विचारला. याऐवजी 'माओवादी संघटना' असा शब्द वापरावा, असं त्यांनी सुचवलं. या विधेयकाच्या जुन्या आणि नव्या मसुद्यात काही फार फरक नसून यातल्या अनेक व्याख्या मोघम असून याचा वापर गळचेपी करण्यासाठी होण्याची भीती व्यक्त केली.   सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सगळ्या संघटनांवर या कायद्यान्वये कारवाई करणार का,...

July 10, 2025 9:07 PM July 10, 2025 9:07 PM

views 11

गणेशोत्सव हा सण राज्य महोत्सव म्हणून घोषित करणार

    महाराष्ट्राला गणेशोत्सवाची शंभर वर्षांची समृद्ध परंपरा असून हा सण राज्य महोत्सव म्हणून हे सरकार घोषित करेल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत दिली. हवा तितका निधी या उत्सवासाठी उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं.

July 10, 2025 6:19 PM July 10, 2025 6:19 PM

views 19

राज्यातल्या १ कोटी ७५ लाख शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्याची विधानसभेत घोषणा

राज्यातल्या १ कोटी ७५ लाख शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा जयस्वाल यांनी आज विधानसभेत केली. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गेल्या तीन वर्षांत सर्वात जास्त रक्कम खर्च करण्यात आली आहे, शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर तीन वर्षात सत्तर हजार कोटींची रक्कम खर्च करण्यात आली आहे, अशी माहिती कृषि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. विरोधी पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर उपस्थित केलेल्या नियम २९३ अन्वये अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. शेतकर्‍यांना पीक विमा...

July 10, 2025 6:16 PM July 10, 2025 6:16 PM

views 5

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी संदीप सांगवे यांचं निलंबन करून विशेष तपास पथकाद्वारे चौकशीची घोषणा

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांचं तत्काळ निलंबन करून विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करायची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत केली. आमदार संजय उपाध्याय यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. असे प्रकार फक्त मुंबईत नाही, तर राज्यात अनेक ठिकाणी आढळून आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयएएस, आयपीएस अधिकारी आणि या क्षेत्रातल्या तज्ञांच्या विशेष तपास पथकाची  स्थापन केली असून कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, अशी ग्वाही...

July 9, 2025 9:08 PM July 9, 2025 9:08 PM

views 125

वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा

राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज  विधानसभेत केली. याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी सांगितलं, की सध्या ५० लाखाहून अधिक कुटुंबांना तुकडेबंदी कायद्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याचा विचार करून, जानेवारी २०२५ पर्यंत नागरी क्षेत्रांमध्ये झालेल्या तुकड्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी तुकडेबंदी कायदा शिथिल केला जाणार आहे. तर भविष्यात हा कायदा कायमचा रद्द करण्यासाठी एसओपी, अर्थात प्रमाण कार्...