April 5, 2025 7:40 PM April 5, 2025 7:40 PM
14
प्रख्यात अभिनेते मनोजकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
प्रख्यात चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या पार्थिवावर आज मुंबईच्या पवन हंस स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेता अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, प्रेम चोप्रा, सलीम खान, रझा मुराद, राजपाल यादव, दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह मनोरंजनविश्वातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. मनोज कुमार यांचं काल पहाटे खासगी रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं. देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे मनोज कुमार हे भारत कुमार या टोपणनावानेही ओळखले जात. वो कौन थी, शहीद, उपकार, हिमालय की ...