November 8, 2025 6:29 PM November 8, 2025 6:29 PM

views 20

मनोज जरांगे यांना पोलिसांचे समन्स

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि इतर पाच जणांना यांना मुंबई पोलिसांनी येत्या सोमवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर होण्याचं समन्स बजावलं आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे यांनी केलेल्या उपोषणादरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं घालून दिलेल्या दिशानिर्देशांचं उल्लंघन झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यासंदर्भात हे समन्स बजावण्यात आलं आहे.

June 29, 2025 7:36 PM June 29, 2025 7:36 PM

views 21

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, येत्या २९ ऑगस्टला मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा

मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्टला मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांनी आज जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं मराठा समाजबांधवांची राज्यव्यापी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. आता आपल्याला रणभूमीत उतरून मैदान गाजवायचं असून, विजय खेचून आणायचा आहे. आता ही आरपारची लढाई असून, मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबईतून माघारी फिरायचे नाही, असं ते म्हणाले. येत्या २७ ऑगस्टला आंतरवली सराटीतून निघून दोन दिवसांत मुंबईत पोहोचण्याचा नि...

January 30, 2025 7:04 PM January 30, 2025 7:04 PM

views 202

मनोज जरांगे यांचं सहाव्या दिवशी उपोषण स्थगित

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासह इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज सहाव्या दिवशी उपोषण स्थगित केलं. शिंदे समितीचं काम पुन्हा सुरू करण्यात  येईल, मराठा  आरक्षण आंदोलकांवर दाखल गुन्ह्यांची तपासणी करून गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरू केली जाईल, कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी स्थापन केलेले कक्ष पुन्हा सुरू केला जातील, असं लेखी  आश्वासन जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण स्थगित करायचा निर्णय घेतला. मात्र, मागण्...

January 6, 2025 8:02 PM January 6, 2025 8:02 PM

views 11

मनोज जरांगे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात ओबीसी समाज आक्रमक

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून जरांगे यांच्या विरोधात बीड, अंबाजोगाई, किल्ले धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरांगे यांच्या निषेधात केज पोलीस ठाण्यात ओबीसी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर गेवराई पोलीस ठाण्यात जरांगे यांचे समर्थक मोठ्या संख्येने दाखल झाले असून परिस्थितीत तणाव निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

November 4, 2024 7:51 PM November 4, 2024 7:51 PM

views 10

मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मित्रपक्षांनी उमेदवारांची यादी पाठवली नसल्यामुळे माघार घेत असल्याचं, त्यांनी आज सकाळी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बातमीदारांना सांगितलं. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठीचा लढा यापुढेही सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले.  दरम्यान, या निर्णयाशी आपला काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा शरद पवारांनी दिला.

November 3, 2024 6:33 PM November 3, 2024 6:33 PM

views 13

मनोज जरांगे पाटील यांचीआंतरवाली सराटी इथं सहकाऱ्यांसोबत बैठक

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी आज आंतरवाली सराटी इथं सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या निवडणुकीत कोणत्या जागा लढवायच्या याबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. ज्या जागा जिंकून येणं शक्य आहे तिथंच उमेदवार देऊ आणि इतर ठिकाणी आपल्याला त्रास देणाऱ्यांचा पराभव करू, अशी भूमिका जरांगे यांनी यावेळी मांडली. मराठवाड्यातल्या जालना, भोकरदन, बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली या मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

October 15, 2024 7:57 PM October 15, 2024 7:57 PM

views 9

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मिळू दिलं नाही, जरांगेंचा आरोप

आचारसंहिता लागायच्या आधी मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी आशा होती, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आरक्षण मिळू दिलं नाही, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यांनी आज जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी संवाद साधला. आता विधानसभा निवडणुकीत कुणाच्या जागा वाढवायच्या आणि कुणाच्या कमी करायच्या हे आम्ही ठरवू, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला.    आमची निवडणुकीसाठीही संपूर्ण तयारी आहे. याबाबत लवकरच समाजाची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अस त्यांनी सांगि...

September 26, 2024 9:50 AM September 26, 2024 9:50 AM

views 10

आरक्षणाच्या मागणीसाठीचं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित, ओबीसी उपोषणकर्त्यांचंही उपोषण मागे

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी काल उपोषण स्थगित केलं. आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू, असं जरांगे यांनी यावेळी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात डोंगरगाव पूल इथं नागरिकांनी काल कयाधू नदीपात्रात उतरून आंदोलन केलं. दरम्यान, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं देखील आमरण उपोषण ...

September 22, 2024 9:50 AM September 22, 2024 9:50 AM

views 14

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी घनसावंगी तालुक्यात रास्तारोको आंदोलन, बीड आणि धाराशिव जिल्हा बंदला सर्वत्र प्रतिसाद

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचं जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काल घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी, बानेगाव, भोगगाव, रामसगाव इथं मराठा समाज बांधवांनी रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे तीर्थपुरी मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलकांनी पुकारलेल्या बीड आणि धाराशिव जिल्हा बंदला काल सर्वत्र प्रतिसाद मिळाला. तर लातूर जिल्ह्यातल्या सकल मराठा समाज...

September 1, 2024 7:23 PM September 1, 2024 7:23 PM

views 16

शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचं राजकारण करणं दुर्दैवी – मनोज जरांगे

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचं राजकारण होत असून हा प्रकार महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. अशा घटनेचं राजकारण करणाऱ्यांना राज्याची जनता घरी बसवेल, असं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आज राजकोट इथे म्हणाले. जरांगे यांनी दुर्घटनाग्रस्त पुतळ्याची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. वाढवण बंदराबाबत आपण माहिती घेत असून सरकारने स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही जरांगे यांनी यावेळी केली.