August 27, 2025 3:44 PM August 27, 2025 3:44 PM

views 14

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील जालन्याहून मुंबईसाठी रवाना

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराटी इथून मुंबईकडे निघाला. यात मराठवड्यातील हजारो नागरिक सहभागी झाले आहेत. आपल्याला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरध्वनीवरून चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचं मनोज जरांगे यांनी वार्ताहरांना सांगितलं.   चर्चेसाठी आलेल्या सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याची तयारी जरांगे यांनी दाखवली, मात्र चर्चा सर्वांसमोर करण्याची अट त्यांनी ठेवली आहे. मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगीसाठी अर्ज क...

June 29, 2025 7:36 PM June 29, 2025 7:36 PM

views 20

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, येत्या २९ ऑगस्टला मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा

मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्टला मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांनी आज जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं मराठा समाजबांधवांची राज्यव्यापी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. आता आपल्याला रणभूमीत उतरून मैदान गाजवायचं असून, विजय खेचून आणायचा आहे. आता ही आरपारची लढाई असून, मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबईतून माघारी फिरायचे नाही, असं ते म्हणाले. येत्या २७ ऑगस्टला आंतरवली सराटीतून निघून दोन दिवसांत मुंबईत पोहोचण्याचा नि...

January 25, 2025 7:21 PM January 25, 2025 7:21 PM

views 3

मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य कराव्यात यासाठी मनोज जरांगे यांची पुन्हा उपोषणाला सुरुवात

मराठा समाजाच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मागण्या मान्य कराव्यात असे सांगत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज जालन्यात अंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. मराठा समाजाला इतर मागास वर्गीय समाजातून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

August 29, 2024 7:24 PM August 29, 2024 7:24 PM

views 13

मनोज जरांगे यांचा २९ सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार आज आंतरवाली सराटी इथं जाहीर केला. गेल्या वर्षी २९ ऑगस्ट याच दिवशी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटीमधून त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं.   या आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी आज आंदोलक समन्वयकांची आंतरवाली इथं बैठक बोलावली होती. त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असं ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जरांगे यांनी टीका केली.

July 30, 2024 7:57 PM July 30, 2024 7:57 PM

views 11

मनोज जरांगे यांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवाव्यात – प्रकाश आंबेडकर

मराठा समाजातल्या गरीबांसाठी मनोज जरांगे यांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवाव्यात, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. वंचित बहुजन आघाडीनं लातूर इथं काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेत ते बोलत होते. मराठा समाजात श्रीमंत आणि गरीब असे दोन गट आहेत. त्यामुळे जरांगे यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरून सर्व जागा लढवाव्यात असं ते म्हणाले.

July 20, 2024 12:15 PM July 20, 2024 12:15 PM

views 12

मनोज जरांगे पाटलांचे आजपासून पुन्हा आमरण उपोषण

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यापूर्वीच्या उपोषणावेळी सरकारच्या शिष्टमंडळानं दिलेलं कुठलंही आश्वासन पाळलं नाही, त्यामुळे पुन्हा उपोषणाचा निर्णय घेतल्याचं, त्यांनी सांगितलं.

June 13, 2024 7:28 PM June 13, 2024 7:28 PM

views 40

मनोज जरांगेंच उपोषण स्थगित

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटी इथं सुरू असलेलं आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मंत्री शंभुराज देसाई, संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे.   सरकार सग्या सोयऱ्यांच्या कायद्याबद्दल सकारात्मक असून यावर एका महिन्यात निर्णय घेण्यात येईल, असं शंभुराज देसाई यांनी उपस्थित आंदोलकांना सांगितलं. तर सरकार १३ जुलैपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण करेल, अशी अपेक्षा मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे.