September 28, 2025 7:01 PM
71
आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट गाठण्याकरता सणासुदीची खरेदी स्वदेशी वस्तूंची करावी – प्रधानमंत्री
आगामी सणासुदीचा काळ स्वदेशी गोष्टींचा वापर करून साजरा करण्याचा संकल्प करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे सव्वीसाव्या भागात देशवासीयांशी संवाद साधला. आपल्याला आत्मनिर्भर बनायचं आहे आणि या ध्येयाचा मार्ग स्वदेशीतूनच पुढे जातो असं ते म्हणाले. जीएसटी सुधारणांमुळे बचत उत्सव साजरा होत असताना व्होकल फॉर लोकल हा आपल्या सर्वांचा खरेदीचा एक मंत्र बनला पाहिजे, या संकल्पामुळे आपल्या सणांची रंगत अनेक पटीनं वाढेल असं त्यां...