May 24, 2025 2:12 PM May 24, 2025 2:12 PM

views 8

प्रधानमंत्री आकाशवाणीवर ‘मन की बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा १२२ वा भाग असेल. या कार्यक्रमाचं आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा, युट्यूब वाहिन्या, संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरून थेट प्रसारण होईल. आकाशवाणीवर मूळ प्रसारणानंतर लगेचच या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषेतल्या अनुवादाचं प्रसारण होईल.

May 19, 2025 7:14 PM May 19, 2025 7:14 PM

views 7

प्रधानमंत्री ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे २५ मे रोजी श्रोत्यांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे येत्या २५ मे रोजी देशविदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२२ वा भाग असेल. श्रोते या कार्यक्रमासाठी सूचना १ ८ ० ० १ १ ७ ८ ० ० या टोल फ्री क्रमांकावर पाठवू शकता. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय गव्ह ॲपद्वारेही आपल्या सूचना २३ मे पर्यंत पाठवता येतील.  

April 27, 2025 1:40 PM April 27, 2025 1:40 PM

views 11

दहशतवादाविरोधातल्या लढ्यात देशातली ‘एकी’ हीच सर्वात मोठी ताकद – प्रधानमंत्री

दहशतवादाविरोधातल्या लढ्यात देशातली एकी हीच सर्वात मोठी ताकद असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या कार्यक्रमातून सांगितलं. हा या कार्यक्रमाचा एकशे एकविसावा भाग होता.    सुरुवातीलाच प्रधानमंत्र्यांनी पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनं आपलं मन व्यथित झाल्याची भावना व्यक्त केली. या हल्ल्यामुळे देशातला प्रत्येक नागरिक दुःखी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत असताना, शाळा-महाविद्यालयांमध्ये चैतन्य निर्माण होत असताना आणि पर्यटकांची ...

April 7, 2025 1:48 PM April 7, 2025 1:48 PM

views 10

प्रधानमंत्री २७ एप्रिलला ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीवरून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २७ एप्रिल रोजी 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीवरुन देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२१वा भाग असेल. कार्यक्रमाकरता आपल्या सूचना किंवा प्रश्न १८०० – ११ – ७८०० या टोलफ्री क्रमांकावर नोंदवता येतील. नरेंद्र मोदी ॲप किंवा मायगोव्ह ओपन फोरम द्वारे देखील सूचना नोंदवता येतील. येत्या २५ तारखेपर्यंत येणाऱ्या सूचनांचा विचार करण्यात येईल.

March 30, 2025 2:13 PM March 30, 2025 2:13 PM

views 7

प्रधानमंत्र्यांचा ‘मन की बात’मधून श्रोत्यांशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा एकशे विसावा भाग होता. आपल्या सणांतून दिसणारी एकतेची भावना आपल्याला सतत्यानं बळकट करायची आहे असं आवाहन त्यांनी केलं.  महाराष्ट्रातल्या गुढीपाडव्यासह, देशभरात विविध ठिकाणी येत्या काही दिवसात नववर्षाच्या स्वागतासाठी साजऱ्या होणार असलेल्या रोंगाली बिहू, पोईला बोइशाख, नवरेह सणाच्या, तसंच ईदच्याही शुभेच्छा त्यांनी दिल्या.    यानिमित्तानं प्रधानमंत्र्यांनी त्यांना विविध भाषांमध्...

February 23, 2025 7:28 PM February 23, 2025 7:28 PM

views 7

AI मध्ये युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला भारतीय युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आकाशवाणीवर ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा ११९वा भाग होता. नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून त्याचा अवलंब करण्यात भारतातील लोक कोणापेक्षाही मागे नसल्याचं ते म्हणाले.    गेल्याच महिन्यात इस्रोचं शंभरावं रॉकेट प्रक्षेपण झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.     इसरोच...

February 22, 2025 12:35 PM February 22, 2025 12:35 PM

प्रधानमंत्री’मन की बात’कार्यक्रमातून उद्या देशवासीयांशी साधणार संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात देश-विदेशातल्या जनतेशी आपले विचार मांडणार आहेत. दर महिन्यात प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा ११९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या संपूर्ण प्रसारणांमध्ये, आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि मोबाईल अँप वर देखील या कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहेत. मन की बात कार्यक्रमाचं आकाशवाणी न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिनीवर थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच आकाशवाणीवरून हा क...

January 19, 2025 7:14 PM January 19, 2025 7:14 PM

views 16

संविधान सभेच्या चर्चेचा गौरवशाली वारसा, भारत घडवण्यासाठी प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’ मधून आवाहन

संविधान सभेत झालेल्या चर्चा, सदस्यांनी मांडलेले विचार, हा आपला सर्वात मोठा वारसा असून संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा, असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहिलं पाहिजे, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून केलं.   भारताच्या प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिन, तसंच भारतीय संविधान लागू झाल्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यानिमीत्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी संविधान सभेत मांडलेल्या विचारांचं ध्वनिमुद्रण प्रधानमंत्र्यांनी...

December 29, 2024 1:55 PM December 29, 2024 1:55 PM

views 5

मनोरंजन आणि आरोग्य क्षेत्रातल्या कामगिरीचा प्रधानमंत्र्यांनी केला गौरव

    भारताच्या पारंपरिक कलांपासून आयुर्वेदापर्यंत आणि भाषांपासून संगीतापर्यंत असंख्य गोष्टींनी संपूर्ण जगाला व्यापलं आहे प्रधानमंत्री म्हणाले. जगभरात भारतीय संस्कृतीची छाप कशी उमटली आहे, याविषयीची देशो देशीची उदाहरणंही त्यांनी आजच्या मन की बात मधून श्रोत्यांसमोर मांडली. हिवाळ्याच्या मोसमात देशभरात खेळ आणि तंदुरुस्ती विषयक राबवल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. बस्तर इथं सुरू झालेल्या बस्तर ऑलिम्पिक या अभिनव स्पर्धेची माहिती देताना ते म्हणाले की या  स्पर्धा म्हणजे विकास आणि खेळाचा स...

December 15, 2024 7:23 PM December 15, 2024 7:23 PM

views 6

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २९ डिसेंबरला आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये नागरिकांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २९ डिसेंबर रोजी आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमामध्ये देशातील आणि परदेशातील लोकांशी संवाद साधणार आहेत. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा ११७ वा भाग असेल.   या कार्यक्रमासाठी नागरिक आपले विचार आणि सूचना टोल फ्री क्रमांक 1800-11-7800 वरून पाठवू शकतात. तसेच, नरेंद्र मोदी अ‍ॅप किंवा MyGovओपन फोरमद्वारे ऑनलाइनही आपले मत सामायिक करू शकतात. येत्या भागासाठीच्या सूचना या महिन्याच्या २७ तारखेपर्यंत स्वीकारल्या जातील.