December 28, 2025 7:35 PM December 28, 2025 7:35 PM
28
आगामी वर्षात देश नवी आशा आणि संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
२०२५ या सरत्या वर्षानं भारताला मोठा आत्मविश्वास दिला असून, आता देश २०२६ मध्ये नवी आशा आणि नव्या संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते. हा या कार्यक्रमाचा १२९ वा भाग होता. २०२५ या वर्षाने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला लावणारे क्षण दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सरत्या वर्षातलं ऑपरेशन सिंदूर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं प्रतीक बनलं असून, आजचा भारत आपल्या सुर...