January 18, 2025 1:45 PM January 18, 2025 1:45 PM
7
प्रधानमंत्री उद्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवाशीयांशी साधणार संवाद
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशविदेशात राहणाऱ्या भारतीयांसमोर आपले विचार मांडणार आहेत. हा या कार्यक्रमाचा एकशे अठरावा (११८) भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच ए आय आर चे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वरून प्रसारित केला जाणार आहे. त्याशिवाय हा कार्यक्रम एआयआर न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यलय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिनीवरून थेट प्रसारित केला जाणार आहे.