June 8, 2025 8:03 PM June 8, 2025 8:03 PM

views 10

मणिपूरमधल्या ३ बंडखोरांना NIAकडून अटक

प्राणघातक हल्ला करून संरक्षण दलाच्या दोन जवानांचा बळी घेणाऱ्या मणिपूर मधल्या तीन बंडखोरांना आज एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकानं अटक केली. हे बंडखोर कुकी इनपी तेंगनौपाल बंडखोर  समूह, कुकी नॅशनल आर्मी तसंच चुरा चंदपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण स्वयंसेवक समुहाचे हस्तक आहेत. या बंडखोरांनी गेल्यावर्षी १७ जानेवारीला मोरेह इथं केलेल्या हल्ल्यात काही जवान जखमी झाले होते. या हल्ल्यात सामील असलेल्या इतर बंडखोरांचा शोध घेण्याची मोहीम सुरू  असल्याचं एनआयएनं म्हटलं आहे.