December 16, 2025 8:59 PM December 16, 2025 8:59 PM

views 12

सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयातही दोषी

मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या दहा टक्के राखीव कोट्यातून मिळवलेल्या चार सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना आज नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं.    सवलतीच्या दरात घरं मिळवण्यासाठी कोकाटे यांनी खोटी कागदपत्रं सादर केली, तसंच आपल्या नावावर घर नसल्याचं प्रतिज्ञापत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी याआधी २० फेब्रुवारीला नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी कोकाटे बंधूंना दोषी ठरवत दोन वर्षांचा सश्रम कार...

March 30, 2025 8:54 PM March 30, 2025 8:54 PM

views 22

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील -माणिकराव कोकाटे

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवण्याचं आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलं आहे. ते आज नाशिक जिल्ह्यात वावी इथल्या जामनदी खोरे शेतकरी उत्पादक कंपनीच्या १ हजार टन क्षमतेच्या गोदामाच्या बांधकामाचा प्रारंभ करताना बोलत होते.    शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असं त्यांनी सांगितलं. ‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांचं जाळं निर्माण झालं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठबळामुळे या प्रकल्पाला चालना मिळा...

March 5, 2025 3:50 PM March 5, 2025 3:50 PM

views 108

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू शिवाजी कोकाटे यांना ठोठावलेल्या दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं आज स्थगिती दिली. यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरची टांगती तलवार दूर झाली आहे. कोकाटे यांच्या विरोधात दाखल झालेल्या तिन्ही हस्तक्षेप याचिकाही न्यायालयानं फेटाळून लावल्या. सुमारे २० वर्षांपूर्वी खोटी कागदपत्रं देऊन मुख्यमंत्री कोट्यातली सदनिका घेतल्याप्रकरणी कोकाटे बंधूंना न्यायालयानं २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

March 1, 2025 7:52 PM March 1, 2025 7:52 PM

views 15

माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवर ५ मार्चला सुनावणी

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला त्यांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिलं असून यावर ५ मार्च रोजी न्यायालय निकाल सुनावणार आहे. सदनिका खरेदी करताना कोकाटे यांनी खोटी माहिती दिली यासाठी त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुुनावली आहे, या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे यांनी अर्ज दाखल केला होता. कोकाटे यांच्या या मागणीला दोन अर्जदारांनी विरोध केला होता.

February 22, 2025 3:15 PM February 22, 2025 3:15 PM

views 12

राज्य शासनामार्फत नवीन कृषी धोरण आखणार- कृषी मंत्री

राज्य शासनामार्फत नवीन कृषी धोरण आखणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि अन्न धान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वंयपूर्ण व्हावा, या उद्देश्यानं हे धोरण आखणार असल्याचं कोकाटे यांनी सांगितलं.   \काल कोल्हापूर इथं झालेल्या प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी परिसंवादात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी उपस्थित होते.

February 14, 2025 3:29 PM February 14, 2025 3:29 PM

views 13

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषीमंत्री कक्षाची स्थापन

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणं सोपं व्हावं यासाठी विभाग स्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. नागपूर इथं प्रगतीशील शेतकऱ्यांच्या परिसंवाद कार्यक्रमात ते काल बोलत होते.   शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेक योजना, उपक्रम राबवले जात आहेत, शासन शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे, असं कोकाटे म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

January 11, 2025 8:13 PM January 11, 2025 8:13 PM

views 12

बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करणार -माणिकराव कोकाटे

बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचं आश्वासन राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज नाशिक इथं दिलं. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत मिनी सरस आणि जिल्हास्तरीय स्वयंसहायता समुहांची उत्पादनं तसंच विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन नाशिकमध्ये झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ड्रोन दिदी, लखपती दिदी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

December 22, 2024 5:59 PM December 22, 2024 5:59 PM

views 8

कांद्यासंदर्भात निश्चीत धोरण ठरवण्यासाठी पाठपुरावा करण्याची कृषीमंत्र्यांची ग्वाही

कांद्यासंदर्भात निश्चीत धोरण ठरवण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच नाशिकला आले. त्यावेळी ते बातमीदारांशा बोलत होते. वारंवार वातावरणात होणारे बदल तसंच शेतीमालाच्या भावावर होणारा परीणाम आणि वीजेसह अन्य समस्यांबाबत काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.    दरम्यान, नाशिकमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना यावेळी मंत्री मंडळात स्थान मिळालं नसल्यानं ते नाराज आहेत. मात्र, ते मंत्री असताना आम...