August 13, 2024 4:45 PM August 13, 2024 4:45 PM

views 9

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘अहिल्या भवन’ उभारणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबईत मानखुर्द इथं अहिल्या भवन उभारणार असल्याची घोषणा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज केली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं भवन उभारलं जाईल असं ते म्हणाले. या इमारतीत महिला आयोग आणि बालहक्क आयोगाचे मुंबई विभागाचं कार्यालय असेल. ३५ हजार ५०० चौरस मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारलं जाणार असून त्यासाठी ४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचं मंत्री लोढा यांनी सांगितलं.

July 18, 2024 7:04 PM July 18, 2024 7:04 PM

views 5

‘राज्यातल्या १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार’

राज्यातल्या एक हजार महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. या करता आतापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी अर्ज केल्याची माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मंत्रालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.    आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांवर येत्या ऑगस्टपासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार कालसुसंगत तंत्रज्ञानाचे कौशल्य प्रशिक्षण महाविद्यालयीन युवक युवतींना दे...