January 20, 2025 8:15 PM
16
पुढच्या शंभर दिवसांत ५० हजार युवांना प्रशिक्षण देणार- मंगलप्रभा लोढा
जागतिक बँकेसोबत झालेल्या करारानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून पुढच्या शंभर दिवसांत ५० हजार युवांना प्रशिक्षण देणार असल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभा लोढा यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. मुंबईसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, पुणे इथं महाराष्ट्र इंटरनॅशनल केंद्र सुरू करण्यात येईल, असंही लोढा म्हणाले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीची माहिती मंत्री लोढा यांनी यावेळी दिली. ...