September 17, 2024 11:04 AM September 17, 2024 11:04 AM
17
पश्चिम बंगाल सरकारनं आंदोलक कनिष्ठ डॉक्टरांच्या चारपैकी तीन मागण्या मान्य – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
पश्चिम बंगाल सरकारनं आंदोलक कनिष्ठ डॉक्टरांच्या चारपैकी तीन मागण्या मान्य केल्या आहेत, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. काल रात्री कालीघाट इथल्या निवासस्थानी कनिष्ठ डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, डॉक्टरांची मागणी लक्षात घेऊन कोलकात्याचे पोलिस आयुक्त विनीत गोयल यांना हटविण्यात येईल. पोलीस दलातील बदल आज दुपारी अधिसूचनेद्वारे लागू करण्यात येणार आहेत. दरम्यान कनिष्ठ डॉक्टरांनी आपल्या कामावर रुजू व्हावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.