September 18, 2024 7:46 PM September 18, 2024 7:46 PM
7
चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मालविका बनसोडची पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्य पदक विजेत्या चीनी खेळाडूवर मात
चीन खुली बॅडमिंटन BWF Super 1000 स्पर्धेत आज महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोडनं पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्य पदक विजेत्या ग्रेगोरिया तुंजूंग वर मात केली. तिनं २६-२४, २१-१९ अशा सरळ गेममधे ग्रेगोरियाला पराभूत केलं. आजच्या इतर सामन्यांमधे मात्र भारतीय खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नाही. एकेरीत आकर्षी कश्यप, समीया इमाद फारुखी तर दुहेरी त्रिसा ज्यॉली आणि गायत्री गोपीचंद तसंच मिश्र दुहेरीत एन सिक्कीरेड्डी आणि बी सुमीत रेड्डी पराभूत झाले.