September 5, 2024 7:22 PM
37
महाविकास आघाडी राज्यात मजबूत असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं स्पष्टीकरण
राज्यात महाविकास आघाडी मजबूत आहे, ती कुणीही हलवू शकत नाही, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. ते आज सांगली जिल्ह्यातील वांगी इथं माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या 'लोकतीर्थ' या स्मारकाचं लोकार्पण आणि पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभात बोलत होते. राज्यातलं भाजपा युती सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर काम करत आहे, अशी टीका त्यांनी केली. मालवण राजकोट इथं सिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्यावरुन त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ज्येष्ठ नेते शरद पवार, का...