April 3, 2025 2:45 PM April 3, 2025 2:45 PM
8
राज्यसभेतून विरोधी सदस्यांचा सभात्याग
काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी काल लोकसभेत जमीन हडपल्याचा आरोप केला होता. या निषेधार्थ आज विरोधी सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला. अनुराग ठाकूर यांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. राज्यसभेत अशा प्रकारे कोणाचीही प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये अशी अपेक्षा राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी आचारसंहिता समितीला या संदर्भात निश्चित पद्धती निर्माण करावी असं आवाहनही केले. सभागृहा...