September 18, 2025 7:20 PM September 18, 2025 7:20 PM
21
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची नोटिस
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेले सात जण, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्र सरकारला आज मुंबई उच्च न्यायालयानं नोटिस बजावली आणि सहा आठवड्यांच्या आत उत्तर मागितलं. माजी भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह इतरांच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.