October 6, 2024 1:02 PM October 6, 2024 1:02 PM
6
मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर
मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू आजपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरदेखील ते चर्चा करणार आहेत. मुईज्जू या दौऱ्यात बेंगळुरू आणि मुंबई इथं विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.