July 26, 2025 1:39 PM July 26, 2025 1:39 PM

views 9

मालदीव्जच्या 60व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला प्रधानमंत्री उपस्थित राहणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मालदीव्जचे उपराष्ट्राध्यक्ष हुसैन मोहम्मद लतीफ यांची भेट घेऊन चर्चा केली. परराष्ट्रव्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल तसंच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री त्यांच्यासोबत होते.    प्रधानमंत्र्यांनी मालदीव्जचे माजी प्रधानमंत्री आणि माजी राष्ट्राध्यक्षांचीही भेट घेतली. मालदीव्जचा हीरकमहोत्सवी स्वातंत्र्यदिन आज साजरा होत असून, त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मालदीव्...

July 25, 2025 8:45 PM July 25, 2025 8:45 PM

views 8

मालदिव आणि भारत यांच्यात ४ सामंजस्य करार आणि इतर तीन करार

भारत आणि मालदीव हे देश फक्त शेजारी नाहीत, तर सहप्रवासी आहेत. मालदीवचा विकास आणि समृद्धीसाठी भारत प्रत्येक पावलावर साथ देईल, अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली. मालदीव दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्यासोबत त्यांनी वार्ताहरांना संबोधित केलं. भारताच्या मदतीनं मालदीवमध्ये उभारलेल्या विविध प्रकल्पांमुळे दोन्ही देशांमधले संबंध नव्या उंचीवर गेले आहेत, असं ते म्हणाले. द्विपक्षीय गुंतवणूक करार, हवामान क्षेत्रातलं सहकार्य, नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांध्ये दोन...

July 25, 2025 1:30 PM July 25, 2025 1:30 PM

views 4

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मालदीवची राजधानी मालेमध्ये दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मालदीवची राजधानी माले इथं पोहोचले. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांनी व्हॅलेना आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्री मोदी दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर असून हा त्यांचा तिसरा मालदीव दौरा आहे.   प्रधानमंत्री मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू आज विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. गेल्या वर्षी मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू भारत दौऱ्यावर आले असताना झालेल्या भारत-मालदीव संयुक्त व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीच्या अंमल...

July 20, 2025 7:48 PM July 20, 2025 7:48 PM

views 3

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २५ जुलैपासून दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २५ जुलैपासून दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान ते मालदीवमधल्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन करतील. या भेटीत प्रधानमंत्री आणि मालदीवचे राष्ट्रपती मुइझ्झू  यांच्यात महत्त्वाच्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर उच्चस्तरीय चर्चा होईल. त्यानंतर अनेक संयुक्त प्रकल्पांचं उद्घाटन केलं जाईल. याशिवाय दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य वाढवण्याच्या उद्देशानं अनेक सामंजस्य करारही केले जाणार आहेत.

May 25, 2025 7:25 PM May 25, 2025 7:25 PM

views 3

मालदीवचे परराष्ट्र मंत्री डॉ. अब्दुल्ला खलील आजपासून तीन दिवस भारत दौऱ्यावर

मालदीवचे परराष्ट्र मंत्री डॉ. अब्दुल्ला खलील आजपासून तीन दिवस भारत दौऱ्यावर येणार आहेत. जानेवारी आणि मार्चमध्ये झालेल्या भेटींनंतर परराष्ट्र मंत्री डॉ. खलील यांचा हा या वर्षीचा तिसरा भारत दौरा असेल. या भेटीदरम्यान, ते भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील करतील. दोन्ही देशांमधील व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारी मजबूत करणे हा या भेटीचा उद्देश आहे.  

January 8, 2025 8:25 PM January 8, 2025 8:25 PM

views 2

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घासन मौमून यांच्यात द्विपक्षीय बैठक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घासन मौमून यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक झाली.  या बैठकीत नियमित लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सुरक्षा प्रकल्प तसंच संरक्षण सहकार्य याविषयी दोघांमध्ये चर्चा झाली. भारत-मालदीव सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य, सागरी सुरक्षा भागीदारीसाठी एकत्र काम करण्याबाबत वचनबद्धता दोन्ही देशांनी व्यक्त केली.  यावेळी संरक्षण सहकार्य वाढवण्याबाबत ही दोघांमध्ये चर्चा झाली, मालदीवचे संरक्षण मंत्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून ते गोवा आणि मुंबईलाह...

January 4, 2025 2:50 PM January 4, 2025 2:50 PM

views 2

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्रमंत्री डॉ. अब्दुल्ला खलील यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा

भारताच्या दौऱ्यावर आलेले मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ अब्दुल खलिल आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांच्या काल नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली. भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणानुसार आणि क्षेत्रातल्या सर्वांसाठी सुरक्षा आणि वृद्धी अर्थात सागर या तत्वानुसार भारताचे मालदीव सोबतचे संबंध अतिशय महत्वाचे असल्याचं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. भारत हा नेहमीच संकटकाळी मदत करणारा पहिला देश असून भारतानं मालदीवला कठीण प्रसंगी केलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल खालिल यांनी आभार मानले. भारताच्या...

October 8, 2024 10:53 AM October 8, 2024 10:53 AM

views 14

भारताकडून मालदीवला ४०० दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर

भारताने मालदीवला ४०० दशलक्ष डॉलर्सची मदत आणि पूर्वनिर्धारित अटी आणि शर्तींसह परस्परांचं 3 हजार कोटी रुपयांचं चलन अदलाबदल करण्याला काल मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू यांच्यात काल नवी दिल्लीत झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. मालदीवसमोरील आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर दोन करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली तसंच यापुर...