January 8, 2025 9:17 AM January 8, 2025 9:17 AM
2
मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत ट्रीसा जॉली – गायत्री गोपीचंद यांचा अंतिम सोळामध्ये प्रवेश
मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतल्या सामन्यात थायलंडच्या जोडीचा 21-10, 21-10 पराभव केला आणि अंतिम सोळामध्ये प्रलेश मिळवला. तर लक्ष्य सेनला चीन तैपेईच्या खेळाडूकडून पराभव स्विकारावा लागल्यानं तो स्पर्धेबाहेर पडला. आज मालविका बनसोडचा सामना मलेशियाच्या खेळाडूशी होणार आहे. आकार्षी कश्यपचा सामना डॅनिश शटलर ज्युली जेकोबसेनशी, अनुपमा उपाध्यायचा सामना थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँगशी होणार आहे.