May 24, 2025 7:45 PM May 24, 2025 7:45 PM

views 10

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत किदम्बी श्रीकांतचा अंतिम फेरीत प्रवेश

क्वालालंपूर इथं सुरु असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांतनं आज अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं उपांत्य फेरीत जपानच्या युशी तनाका याचा २१-१८, २४-२२ असा पराभव केला. या विजयाने श्रीकांत यावर्षी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे. अंतिम फेरीत श्रीकांतचा सामना उद्या चीनच्या ली शि फेंग याच्याशी होणार आहे.

May 23, 2025 7:02 PM May 23, 2025 7:02 PM

views 19

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत किदांबी श्रीकांत उपांत्य फेरीत दाखल

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतनं आज पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.  उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या तोमा जुनिअर पोपोवला नमवत श्रीकांतनं उपांत्य फेरीत आगेकूच केली आहे.           भारताच्या  मिश्र दुहेरीची तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिल या   जोडीला    मात्र आज पराभव पत्करावा लागला.  चीनच्या वेई याक्सिन आणि जियांग झेनबॅंग या जोडीनं त्यांच्यावर २४-२२, २१-१३ असं अशी मात  केली.  त्यामुळं तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिल या जोडीचं  आव्हान संपुष्टात आलं अ...