January 12, 2026 1:38 PM

views 34

मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांकडून ‘ग्रोक’ या AI आधारित चॅट बॉटवर बंदी

मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांनी ग्रोक या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅट बॉट वर बंदी घातली आहे. एलोन मस्क यांच्या एक्स ए आय कंपनीने तयार केलेल्या या चॅट बॉट चा वापर अश्लील छायाचित्र, चित्रफिती आणि  इतर अश्लील आशयनिर्मितीसाठी होत असल्यामुळे हे पाऊल उचलल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. डिजिटल विश्वात कार्यरत नागरिकांच्या सुरक्षितता आणि मानवाधिकारांचं यातून उल्लंघन होत असल्याचं इंडोनेशियाचे डिजिटल व्यवहार मंत्री मेतुया हफीद यांनी म्हटलंय.   ग्रोकचा गैरवापर केला जाऊ नये म्हणून अनेक प्रतिबंधात्मक उपाय...

April 1, 2025 8:40 PM

views 13

मलेशियात गॅस पाईपलाईनला आग लागल्याने १०० जण जखमी

मलेशियात आज गॅस पाईपलाईनला आग लागल्याने १०० जण जखमी झाले. ही गॅस पाईपलाईन राजधानी क्वालालंपूर इथे असून पेट्रोनास या कंपनीची आहे. पाईपलाईनमधून गॅसची गळती झाल्याने ही आग लागली. आग लागल्यामुळे होरपळलेल्या, श्वसनाला अडथळे निर्माण झालेल्या तसंच अन्य दुखापतींमुळे जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

January 9, 2025 3:12 PM

views 24

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत बॅडमिंटनपटू एच. एस.प्रणॉय आणि मालविका बनसोड यांनी त्यांच्या गटांमध्ये उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. प्रणॉयनं कॅनडाच्या ब्रायन यांगवर २१-१२,१७-२१,२१-१५ असा पराभव केला. मालविकानं मलेशियाच्याच गोह जिन वेईचा २१-१५, २१-१६ असा पराभव केला.   मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनी दक्षिण कोरियाच्या संग ह्यून को आणि हाय वोन एओम यांचा २१-१३, २१-१४ असा पराभव केला. मिश्र दुहेरीतल्या दुसऱ्या सामन्यात सतीश आणि आद्या यांनी भारताच्याच आशित सूर्या आणि अम...

January 9, 2025 10:43 AM

views 18

मलेशिया खुल्या टेनिस स्पर्धेत भारतीय २ बॅडमिंटनपटूचा उपांत्यपूर्व फेरीच्या आधीच्या फेरीत प्रवेश

मलेशिया खुल्या टेनिस स्पर्धेत बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय आणि मालविका बनसोड यांनी त्यांच्या गटांमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या आधीच्या फेरीत प्रवेश केला आहे. प्रणॉयनं कॅनडाच्या ब्रायन यांगवर 21-12,17-21,21-15 असा पराभव केला. मालविकानं मलेशियाच्याच गोह जिन वेईचा 21-15, 21-16 असा पराभव केला.   मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनी दक्षिण कोरियाच्या संग ह्यून को आणि हाय वोन एओम यांचा 21-13, 21-14 असा पराभव केला. मिश्र दुहेरीतल्या दुसऱ्या सामन्यात सतीश आणि आद्या यांनी भारताच्याच आशित स...

January 8, 2025 4:35 PM

views 19

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या ४ खेळाडूंचा प्रवेश

क्वालालंपूर इथे सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा कॅस्ट्रो यांनी आज उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी दक्षिण कोरियाच्या सुंग ह्युन को आणि हे वोन इओम यांचा २१-१३, २१-१४ असा सरळ गेममध्ये पराभव केला. आद्या वरियथ आणि सतीश करुणाकरन या अन्य एका भारतीय जोडीनेही मिश्र दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.   त्यांनी आज भारताच्याच अमृता प्रथमेश आणि अशित सूर्या यांचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला. दरम्यान, आजच्या अन...

August 20, 2024 1:21 PM

views 17

भारत आणि मलेशिया यांच्यात व्यापार वाढवणं महत्वाचं – मंत्री पियूष गोयल

भारत आणि मलेशिया यांच्या दरम्यान व्यापार वाढवणं महत्वाचं असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत झालेल्या भारत-मलेशिया सीईओ मंचावरुन ते बोलत होते. दोन्ही देशातल्या उद्योग आणि व्यापाराला बळकटी देण्यासाठी सहकार्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यटन, डिजिटल अर्थव्यवस्था आदी क्षेत्रांमध्ये दोन्ही देश परस्परांना सहकार्य करू शकतात असं गोयल यांनी म्हटलं आहे. तेल आणि वायू उद्योगात भारत प्रगती करत असून मलेशियन कंपन्यांना यात अनेक...

July 20, 2024 8:27 PM

views 13

महिलांच्या आशिया चषक टी 20 क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा मलेशियावर २२ धावांनी विजय

श्रीलंका इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज थायलंडने मलेशियावर २२ धावांनी विजय मिळवला. रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय मैदानात झालेल्या या सामन्यात थायलंडने मलेशियासमोर १३४ धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं, मात्र मलेशियाला ८ गडी गमावून १११ धावांपर्यंतच मजल मारता आली. याच मैदानावर श्रीलंका आणि बांगला देश यांच्यातला सामना सुरू झाला आहे. बांगला देशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा बांगलादेशच्या १५ व्या षटकात ६ बाद ६५ धाव...