July 9, 2025 8:56 AM July 9, 2025 8:56 AM

views 2

बालकांसाठीच्या हिवताप विरोधी उपचार पद्धतीच्या वापराला मान्यता

तान्ह्या बाळांसाठी आणि बालकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या जगातल्या पहिल्या हिवताप उपचारपद्धतीच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. नोवार्टिस या फार्मा कंपनीला हिवतापावरच्या ‘कोआर्टेम’ नावाच्या नवीन औषधाला स्विस अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली आहे. हिवतापामुळे मृत्यू पावणाऱ्यांमध्ये पाच वर्षांखालील मुलांचं प्रमाण अत्याधिक असल्यानं हे औषध विकसित होणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. हिवतापाच्या उपचारासाठी आतापर्यंत तान्ह्या बाळांना मोठ्या मुलांसाठीचं औषध दिलं  जात होतं, ज्यामुळे त्यांना अनेक धोके संभवत होते....