March 24, 2025 8:08 PM March 24, 2025 8:08 PM

views 23

झारखंडमध्ये मेंदूला झालेल्या मलेरियामुळं ५ मुलं दगावली

मेंदूला झालेल्या मलेरियामुळं गेल्या १० दिवसात झारखंडमधल्या साहिबगंज जिल्ह्यातल्या अधिसूचित आद्य जमातीची ५ मुलं दगावली असल्याचं वृत्त आहे.  आणखी सुमारे २० मुलं या विकारानं ग्रस्त असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं औषध पुरवठा केला जात असून अधिक तपासासाठी  एक वैद्यकीय पथक रवाना करण्यात आलं आहे.  खबरदारीचा उपाय म्हणून झारखंड मधल्या इतर जिल्ह्यातल्या बालकांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. 

December 25, 2024 8:20 PM December 25, 2024 8:20 PM

views 8

2030 पर्यंत देशाला मलेरियामुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट

देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळी देशात मलेरियाचे साडेसात कोटी रुग्ण होते, ती संख्या २०२३ पर्यंत ९७ टक्क्यांनी कमी होऊन २० लाखांवर आली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये विविध राज्यांमधल्या १२२ जिल्ह्यांमध्ये मलेरियाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. २०३० पर्यंत देशाला मलेरियामुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवून सरकार काम करत आहे. मलेरियाच्या उच्चाटनासाठी दीर्घकालीन धोरणं, तसंच राष्ट्रीय धोरणात्मक आराखडाही तयार केला आहे.