November 12, 2024 7:09 PM November 12, 2024 7:09 PM
18
काँग्रेस विविध जातींना आपापसात लढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रधानमंत्र्यांचा आरोप
महायुतीचं सरकार हवं, असा जनतेचा आवाज राज्याच्या कानाकोपऱ्यातून ऐकू येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोलापूर इथं जाहीर सभेत म्हणाले. काँग्रेस आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत असून विविध समाजात फूट पाडण्याचा, विविध जातींना आपापसात लढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. महाराष्ट्राला स्थिर आणि विकासाची दृष्टी असणाऱ्या सरकारची गरज असून महायुती सत्तेत आल्यावर दूरगामी योजना आखेल असं मोदी म्हणाले. महायुती सत्तेत आल्यावर राज्याच्या विकासाचा व...