December 15, 2024 8:41 PM

views 47

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात ३३ कॅबीनेट आणि ६ राज्यमंत्र्यांचा शपथविधी

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आज ३३ कॅबीनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. नागपूर इथं राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि  गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. महायुतीच्या मागील सरकारच्या कार्यकाळातील मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावीत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांच्यासह तेरा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. पंकजा मुंडे, चंद...

December 4, 2024 7:31 PM

views 20

महायुतीचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा

महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडनवीस, अजित पवार, आणि इतर नेत्यांनी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या एकूण २३७ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं. यावेळी केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन, आणि भाजपा नेते विजय रूपाणी देखील उपस्थित होते.   राज्यपालांकडे जाण्याआधी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांची बैठक झाली. त्यानंतर, हे तिन्ही नेते...

December 1, 2024 7:15 PM

views 18

राज्यात येत्या 5 डिसेंबरला सरकार स्थापन होणार

महायुतीमध्ये कसलाही वाद नाही असं सांगत महाराष्ट्रात  येत्या गुरुवारी 5 डिसेंबर ला शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उपमुख्यमंत्री बनतील असं त्यांनी काल स्पष्ट केलं.  दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ५ डिसेंबरला मुंबईतल्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाजमाध्यमावरून दिली ...

November 30, 2024 7:20 PM

views 29

मुख्यमंत्री भाजपचा, उपमुख्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे – अजित पवार

महायुती सरकारचा शपविधी ५ डिसेंबरला होणार असून मुख्यमंत्री भाजपचा होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असतील असं पवार म्हणाले. विरोधकांचा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्याचं खापर मतदान यंत्रावर फोडलं जात आहे, अशी टीका करत मतदान यंत्राबद्दल तक्रार करणं योग्य नाही असं पवार म्हणाले. मतदान यंत्रात घोटाळा झाला असेल तर तो सिद्ध करून दाखवला पाहिजे असंही पवार म्हणाले.