December 16, 2025 3:05 PM December 16, 2025 3:05 PM

views 20

२९ महानगरपालिकांचे महापौर हे महायुतीचेच, बावनकुळेंचा विश्वास

राज्यात महायुती ५१ टक्के मताधिक्य घेऊन महानगरपालिका निवडणुका जिंकेल आणि २९ महानगरपालिकांचे महापौर हे महायुतीचेच होतील असा विश्वास भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केला. नागपूरच्या कोराडी येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान हा पक्ष आमचा मित्र पक्ष असून अमरावतीमध्येसुद्धा महायुतीच लढणार असं त्यांनी स्पष्ट केलं.

November 27, 2025 3:49 PM November 27, 2025 3:49 PM

views 21

महायुतीमध्ये निधी देण्यावरून चढाओढ, शरद पवारांचा आरोप

महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये निधी देण्यावरून चढाओढ लागली आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज केला. बारामती इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. हल्ली कामावर मतं मागितली जात नाहीत, तर पैसे देऊन, निधी देऊ अशी आश्वासनं दिली जातात. ही चांगली गोष्ट नाही. अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या, हाच दृष्टिकोन असेल, तर त्यावर भाष्य न केलेलं बरं, असं पवार म्हणाले. राज्य सरकारनं कर्जवसुलीला एका वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी ठरेल, पण शेतकऱ्यांचं झालेलं आर्थिक नुकसान पाहता त्यातली काही र...

November 8, 2025 5:57 PM November 8, 2025 5:57 PM

views 17

‘सिंधुदुर्गात निवडणूक महायुती म्हणून लढण्यासाठी शिवसेना सकारात्मक’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक महायुती म्हणून लढण्यासाठी शिवसेना सकारात्मक आहे, मात्र युती झाली नाही तर शिवसेना स्वबळावर लढण्यासाठी तयार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. ते आज सिंधुर्ग इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंधुदुर्गात नारायण राणे हे महायुतीचे नेते आहेत, त्यांच्या भूमिकेशी आपण सहमत आहोत असं सामंत म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यात महायुती म्हणून निवडणूक लढणार असल्याचं निश्चित झालं आहे, असंही सामंत यांनी सांगितलं. 

May 15, 2025 7:32 PM May 15, 2025 7:32 PM

views 59

महानगरपालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात महानगरपालिका निवडणुका वेळेवर घेण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यम प्रतिनिधीना सांगितलं. या निवडणुका महायुती एकत्रच लढवणार असून कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असं ते म्हणाले.    मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यसरकार लौकरच आपली भूमिका न्यायालयात मांडेल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रशासकीय सुधारणा आणि कार्यक्षमता वाढीच्या उद्देशाने राज्यशास...

March 27, 2025 3:31 PM March 27, 2025 3:31 PM

views 21

महायुतीच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक अर्थसंकल्प असल्याचं ते आज झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.   सरकार स्थापनेवेळी १०० दिवसांचा आराखडा मांडण्यात आला होता. त्या आराखड्यापैकी एकही गोष्ट या अर्थसंकल्पात आली नसल्याची टीका ठाकरे यांनी केली.

February 15, 2025 3:42 PM February 15, 2025 3:42 PM

views 7

नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा इतिहास

विधानसभा निवडणुकीत १५ पैकी १४ आमदार महायुतीचे निवडून देत नाशिक जिल्ह्यानं इतिहास रचला असून याची दखल घेत नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिकमध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या सभेत बोलत होते.   नाशिकच्या विकासासाठी ‘नार- पार- गिरणा’ हा सुमारे सात हजार कोटी रुपयांचा नदी जोड प्रकल्प मंजूर केल्याचं शिंदे यांनी सांगितलं. विरोधकांनी आपल्यावर टीका करण्यापेक्षा आपल्यासारखं सकारात्मक काम करून दाखवावं असं आवाहन शिंदे यांनी केलं.

November 29, 2024 1:41 PM November 29, 2024 1:41 PM

views 18

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत अमित शहा यांच्यासमवेत बैठक

महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी काल रात्री मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा देखील यावेळी उपस्थित होते. भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील, तो आम्हाला पूर्णपणे मान्य असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकीत अमित ...

November 28, 2024 1:40 PM November 28, 2024 1:40 PM

views 22

भाजपा पक्ष श्रेष्ठींसमवेत महायुतीच्या घटक पक्षांची बैठक

महाराष्ट्रात अद्यापही सरकरस्थापना आणि मुख्यमंत्री कोण होणार याविषयी निर्णय झालेला नाही. यासंदर्भात आज नवी दिल्लीत महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आज अमित शहा यांच्याबरोबर संयुक्त बैठक होणार असून त्यानंतर सरकार स्थापनेबद्दल चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.    दरम्यान भाजपचं वरिष्ठ नेतृत्व, अर्थात,  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील, तो आपल्याला पूर्णपणे मान्य असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केलं.  सत्तास्था...

November 24, 2024 10:34 AM November 24, 2024 10:34 AM

views 26

महायुतीचा विजय हा विकासवादाचा, सुशासनाचा आणि सामाजिक न्यायाचा विजय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्रात महायुतीला मिळालेला दणदणीत विजय हा विकासवादाचा, सुशासनाचा आणि सामाजिक न्यायाचा विजय आहे, असं प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केलं. महाराष्ट्र विधानसभा आणि विविध राज्यातल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला मोठं यश मिळाल्यानंतर भाजपाच्या दिल्लीतल्या मुख्यालयात काल विजयोत्सव साजरा करण्यात आला; त्यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. महाराष्ट्रात असत्याचा, घराणेशाहीचा, नकारात्मक विचारांचा पराभव झाला आहे; महाराष्ट्रानं विकसित भारताच्या संकल्पाला आणखी बळकट केल्याचं या यश...

November 15, 2024 6:41 PM November 15, 2024 6:41 PM

views 15

महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्याचं गृहमंत्री अमित शाह यांचं आवाहन

राज्यातलं महायुतीचं सरकार गरजू जनतेला समर्पित आहे, ते पुन्हा सत्तेत आणा, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते आज हिंगोली इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते. जनतेला घरं, स्वच्छतागृहं, पिण्याचं पाणी, धान्य, मोफत गॅस सिलेंडर, मोफत औषधोपचार अशा विविध व्यवस्था हे सरकार देत आहे, असं ते म्हणाले.    काश्मीरमधे 370 कलम पुन्हा लागू करण्याचं आश्वासन काँग्रेस देत आहे, पण त्यांना हे कदापी शक्य होणार नाही, अशी टीका शहा यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. हिंदुत्वाला प...