October 22, 2024 6:29 PM October 22, 2024 6:29 PM

views 152

महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात

महाविकास आघाडीत आता अवघ्या काही जागांबाबत सहमती व्हायची आहे. उर्वरित जागांवर सहमती झाल्याचं काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं म्हटलंय. उर्वरित जागांविषयी चर्चा करण्यासाठी दुपारी साडे ३ वाजता पुन्हा बैठक होणार असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत वार्ताहरांना सांगितलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यावर ते बोलत होते. काँग्रेसची पहिली यादी लवकरच जाहीर होईल, असंही ते म्हणाले.    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी आज अंतिम होईल, अशी मा...

October 18, 2024 9:04 PM October 18, 2024 9:04 PM

views 12

मतदार याद्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत श्वेतपत्रिका काढण्याची महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या गैरप्रकारांची दखल निवडणूक आयोगानं घ्यावी आणि मतदार याद्यांमधल्या अनियमिततेबद्दल श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली आणि त्यांना यासंदर्भात निवेदन दिलं. तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगालाही या संदर्भात पत्र लिहिलं आहे. पराभवाची भीती वाटत असल्यानं महाविकास आघाडीच्या...

October 17, 2024 7:14 PM October 17, 2024 7:14 PM

views 27

महाविकास आघाडीचं जागावाटप आज पूर्ण होण्याची शक्यता

महाविकास आघाडीचं जागावाटप आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत २१६ जागांवर सहमती झाली आहे, उरलेल्या जागांवर आजच्या बैठकीत सहमती होईल, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत पत्रकारपरिषदेत  सांगितलं. काँग्रेसच्या ८४ जागांवरच्या उमेदवारांची छाननी झाली आहे. रविवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर या ८४ किंवा काँग्रेसच्या सर्व जागांवरचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. समाजवादी पक्षाला महाविकास आघाडी काही जागा देणार आहे, असंही ते म्हणाले. राज्य...

October 16, 2024 7:31 PM October 16, 2024 7:31 PM

views 39

महाविकास आघाडीत २८८ पैकी २२४ जागांवर सहमती

महाविकास आघाडीत २८८ पैकी २२४ जागांवर सहमती झाली आहे. उद्या उर्वरित जागांवर सहमती होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. नवी दिल्लीत पक्षाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आज ८४ जागांच्या उमेदवारांंबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. 

September 5, 2024 7:22 PM September 5, 2024 7:22 PM

views 37

महाविकास आघाडी राज्यात मजबूत असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं स्पष्टीकरण

राज्यात महाविकास आघाडी मजबूत आहे, ती कुणीही हलवू शकत नाही, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. ते आज सांगली जिल्ह्यातील वांगी इथं माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या 'लोकतीर्थ' या स्मारकाचं लोकार्पण आणि पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभात बोलत होते. राज्यातलं भाजपा युती सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर काम करत आहे, अशी टीका त्यांनी केली. मालवण राजकोट इथं सिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्यावरुन त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ज्येष्ठ नेते शरद पवार, का...

September 1, 2024 8:18 PM September 1, 2024 8:18 PM

views 31

शिवरायांचा पुतळा पडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मविआचं आंदोलन

महाराष्ट्रात मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं आज मुंबईत आंदोलन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्विराज चव्हाण, आमदार भाई जगताप, छत्रपती शाहू महाराज यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात जमून सरका...

August 28, 2024 4:50 PM August 28, 2024 4:50 PM

views 12

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याची पाहणी

राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा केवळ पुतळा पडला नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. जयंत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत राजकोट किल्ल्याला भेट दिली. त्यापूर्वी वार्ताहरांशी संवाद साधताना पाटील बोलत होते.  पुतळा बनवण्याचं काम अपरिपक्व माणसाला दिलं होतं, याची जबाबदारी सरकारला झटकता येणार नाही, असं पाटील म्हणाले. या प्रकरणाची चौकश...

August 28, 2024 3:35 PM August 28, 2024 3:35 PM

views 33

महाविकास आघाडी येत्या रविवारी गेट वे ऑफ इंडिया इथं आंदोलन करणार

राजकोट किल्ल्यातला छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा कोसळणं ही घटना संतापजनक आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी येत्या रविवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं आंदोलन करणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतर्फे आज मालवणात मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. जोरदार वाऱ्यामुळे पुतळा कोसळण्याची घटना क...

August 21, 2024 7:07 PM August 21, 2024 7:07 PM

views 31

बदलापूरमधील लहान मुलींवरील अत्याचारप्रकरणी २४ तारखेला मविआचा ‘महाराष्ट्र बंद’

बदलापूरमध्ये लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं येत्या शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला असल्याचं  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर  मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते.  राज्यात लहान मुलं, महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रकरणात अनेक पटींनी वाढ झाली आहे. त्यामुळं हा बंद पुकारल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. याच मुद्द्यावर काँग्रेसनं आज मंत्रालयासमोर आंदोलन केलं. विरोधी पक्षन...

August 16, 2024 7:11 PM August 16, 2024 7:11 PM

views 13

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत मविआचा मेळावा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, त्याला पाठिंबा देण्याची घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज मुंबईत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी तयार असून ही महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची लढाई असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. आरक्षणाची ५० टक्क्याची मर्यादा वाढवण्यासाठी विधेयक आणलं तर महाविकास आघाडीचे पक्ष त्याला पाठिंबा देतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.  &nb...