November 1, 2025 6:57 PM November 1, 2025 6:57 PM
146
मतदार याद्यांतील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी मविआचा मोर्चा
मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीनं आज मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढला आहे. या मोर्चात जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माकपचे राज्य सचिव डॉ अजित नवले, भापकचे सुभाष लांडे सहभागी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर लोकांच्या मनात संसदीय लोकशाहीबद्दल अविश्वास निर्माण झाला असून सत्तेचा सातत्याने गैरवापर केला जात आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला....