October 2, 2025 3:10 PM October 2, 2025 3:10 PM
16
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देशभरात अभिवादन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५६व्या जयंतीनिमित्त देश त्यांना अभिवादन करीत आहे. देशभरात आणि परदेशातल्या भारतीय दूतावासांमधे त्यानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. नवी दिल्लीत राजघाट इथं महात्मा गांधींच्या समाधीस्थळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिरला यांनी राजघाट इथं पुष्पांजली अर्पण केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेले शांति, सहिष्णुता आणि सत्य यांचे आदर्श...