June 27, 2025 4:23 PM June 27, 2025 4:23 PM

views 18

मुंबईतल्या खासगी बस चालक १ जुलैपासून बेमुदत संपावर

मुंबईतल्या खासगी बस चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी १ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामध्ये सर्व प्रकारच्या बसचे चालक, शालेय बस चालक, उबर बस चालक आणि खाजगी वाहतुकदारांचा समावेश आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होणार असून प्रवाशांचे हाल होणार असल्याची शक्यता आहे. सरकारनं ३० जून नंतर मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मुंबईतल्या विविध प्रवासी वाहतूक संघटनांनी अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुंबई बस मालक संघटननं म्हटलं आहे.

June 27, 2025 9:52 AM June 27, 2025 9:52 AM

views 15

शक्तीपीठ महामार्गामुळं मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यास मदत-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

एक महामार्ग अर्थव्यवस्थेची अनेक दालनं उघडी करतो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत केलं आहे. शक्तीपीठ महामार्गामुळं मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यास मदत होणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. महामार्गाच्या प्रत्येक १०० किलोमीटर अंतरावर पाचशे ते एक हजार शेततळी तयार करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  

June 2, 2025 7:36 PM June 2, 2025 7:36 PM

views 10

नागपूरमधल्या अस्थिमज्जा ट्रान्सप्लांट युनिट सुरु करण्यासाठी एनटीपीसीकडून आर्थिक मदत

नागपूरमधल्या एम्समध्ये बोन मॅरो म्हणजेच अस्थिमज्जा ट्रान्सप्लांट युनिट सुरु करण्यासाठी एनटीपीसी नं आर्थिक मदत दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत एनटीपीसी नं याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या युनिटच्या स्थापनेमुळे रुग्णांना सिकल सेल, थॅलेसेमिया, कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवर नागपूरमध्येच उपचार मिळणार असून त्यांना दिल्ली मुंबईसारख्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.

January 2, 2025 10:14 AM January 2, 2025 10:14 AM

views 11

वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाअंतर्गत हिंगोली आणि नांदेडमध्ये वाचन उपक्रमांचं आयोजन

“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं काल जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस. एम. रचावाड यांच्या हस्ते उद्घाटन झालं. हा उपक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज सामूहिक ...