October 20, 2025 3:07 PM

views 69

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत दुसरा हप्ता महाराष्ट्राला मंजूर

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या वाट्याचा दुसरा हप्ता महाराष्ट्राला मंजूर झाला आहे. यामुळे यंदाच्या मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळं बाधित झालेल्यांना तात्काळ मदत देण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी १ हजार ५६६ कोटी ४० लाख रुपये निधी महाराष्ट्राला मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या मदतीसाठी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. ही अग्रिम मदत असून अं...

October 19, 2025 10:09 AM

views 124

पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत जारी

यंदा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी ३ हजार २५८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं जारी केला. राज्यभरातल्या २३ जिल्ह्यांतल्या ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक आणि कोकण प्रशासकीय विभागातले हे शेतकरी आहेत. या जिल्ह्यांमधल्या २७ लाख ५९ हजार हेक्टर पेक्षा अधिक शेतीचं नुकसान झाल्यानं ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. गेल्या आठवडाभरात सुमारे ५ हजार कोटींच्या निधी वितरणा...

October 19, 2025 9:50 AM

views 108

पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत जारी

यंदा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी ३ हजार २५८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं जारी केला. राज्यभरातल्या २३ जिल्ह्यांतल्या ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक आणि कोकण प्रशासकीय विभागातले हे शेतकरी आहेत. या जिल्ह्यांमधल्या २७ लाख ५९ हजार हेक्टर पेक्षा अधिक शेतीचं नुकसान झाल्यानं ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. गेल्या आठवडाभरात सुमारे ५ हजार कोटींच्या निधी वितरणा...

October 18, 2025 5:45 PM

views 32

राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ विशेष तपासणी अभियान

अन्न आणि औषध प्रशासनामार्फत राज्यात 'सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा' हे विशेष तपासणी अभियान राबवण्यात येत असून याअंतर्गत १२ ऑक्टोबरपर्यंत ३ हजार ४५८ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध खाद्यपदार्थांचे एकंदर ४ हजार ६७६ नमुने तपासण्यात आले आणि अनियमितता आढळलेल्या १ हजार ४३१ आस्थापनांना सुधारणा नोटिस देण्यात आल्याची, तर ४८ आस्थापनांचे परवाने निलंबित केल्याची, तर एका आस्थापनेचा परवाना रद्द केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दिली आहे.

October 17, 2025 8:32 PM

views 100

अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांना मदत जारी

गेल्या महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी एक हजार 356 कोटी रुपयांची मदत मंजूर झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे.  सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या जिल्हांमधल्या २१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८१ हेक्टरहून अधिक बाधित पिकांसाठी ही मदत मिळेल. यासाठीचा शासन निर्णय झाल्याचं त्यांनी पत्रकाद्वारे म्हटलं आहे.    या आपत्तीत मृत्यूमूखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना, ज्यांच्या पशुधनाचे नुकसान झाल...

October 16, 2025 8:13 PM

views 34

महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधल्या हवामानात बदल

महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधल्या हवामानात  बदल झाल्याचं दिसून येत असल्याचं युनिसेफ इंडियाचे हवामान तज्ज्ञ युसूफ कबीर यांनी आज सांगितलं. पत्र सूचना कार्यालय, मुंबई आणि युनिसेफ, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान बदल आणि पर्यावरणीय शाश्वता या विषयावर मुंबईत आयोजित परिसंवादात ते बोलत होते.    सातारा जिल्ह्याच्या काही भागात कमी पाऊस पडायचा, आता तिथं  मुसळधार पाऊस होत असल्याकडे, कबीर यांनी लक्ष वेधलं. हवामानातल्या या बदलांचा अभ्यास केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था...

October 15, 2025 6:39 PM

views 31

सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकांचं प्रशिक्षण देणं आवश्यक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ते महत्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे त्यांना निवडणुकांचं प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज साताऱ्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. हे प्रशिक्षण लवकरात लवकर देण्यासाठी मुख्य पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असं त्यांनी सांगितलं.   आपल्या निवडणुका पार पडल्यात, आता होणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे आता नेत्यांनी कार्यकर्ता होत त्यांना निवडून आणावं, असं आ...

October 15, 2025 6:34 PM

views 64

शेतकऱ्यांच्या हिताविरोधात कोणतंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही – कृषीमंत्री

शेतकऱ्यांच्या सेंद्रीय उत्पादनांचं प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताविरोधात कोणतंही कृत्य करत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. ते आज मंत्रालयात सेंद्रिय प्रमाणीकरण संस्थांसंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते.    शेतकऱ्यांच्या उत्पादनांचं प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्या तरी राज्यातल्या सेंद्रीय प्रमाणित आणि नैसर्गिक शेती उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासन त्यांच्या सेंद्रीय ...

October 14, 2025 7:08 PM

views 348

बांबू लागवड आणि प्रक्रीया उद्योगाला चालना देण्यासाठी ‘बांबू धोरण’ जाहीर

राज्य सरकारनं आगामी ५ वर्षांसाठीच्या बांबू धोरणाला आज मंजुरी दिली. यामुळं ५० हजार कोटींची गुंतवणूक आणि ५ लाख रोजगार निर्मितीची शक्यता आहे.   राष्ट्रीय बांबू मिशन आणि महाराष्ट्र मिशन २०२३ शी सुसंगत बांबू धोरणाला राज्य मंत्रीमंडळाची आज मंजुरी मिळाली. या धोरणात बांबू शेतकरी उत्पादक संघटना (FPO), कंत्राटी शेती आणि ऊर्जा, उद्योग आणि इतर घरगुती क्षेत्रांमध्ये बांबूच्या वापराला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. राज्यभरात १५ बांबू क्लस्टर्स स्थापन केले जाणार असून दुर्गम भागातल्या बांबू कारागीरांसाठी सुविध...

October 13, 2025 6:59 PM

views 28

राज्यातून होणारी निर्यात १० पटीनं वाढवण्यासाठी १२ नवीन धोरणं – उद्योगमंत्री उदय सामंत

राज्यातून होणारी निर्यात दहा पटीनं वाढवण्यासाठी 12 नवीन धोरणं आणली जात असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. या धोरणांमुळे उद्योजकांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या तीन वर्षांच्या "महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारां"चं वितरण सामंत यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.    महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात कायमस्वरूपी ‘एक नंबर’ वर ठेवण्यासाठी आवश्यक ती ताकद उद्योजकांना देण्याची राज्य शासनाची तयारी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.    निर्यात वाढ...