November 3, 2025 3:31 PM

views 31

वैद्यकीय महाविद्यालय आणि आवश्यक पायाभूत सुविधांसाठी सरकारचं प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीला राज्य सरकारचं प्राधान्य आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं. औंंध इथं बहुउद्देशीय दंंत रुग्णालय आणि संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत इंडियन डेंटल असोसिएशन, पुणे जिल्हा परिषद आणि औंधचं जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला, त्यावेळी पवार बोलत होते. हा सामंजस्य करार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील नवा अध्याय आहे असे सांगून सर्वसामान्य नागरिकांना  माफक दरात दंत विषयक आरोग्य सुविधा ...

November 1, 2025 6:54 PM

views 106

मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीला राज्यात येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरुवात

केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मूग, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या खरेदीला येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना ॲपद्वारे किंवा खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करता येईल. या नोंदणीला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे तर अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे.   खरेदीचा कालावधी १५ नोव्हेंबरपासून पुढील ९० दिवसांसाठी असेल. शेतकऱ्यांनी नजीकच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी कागदपत्रांसह अर्ज करावा आणि नाफेडच्या धान्य खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन पणन अध...

October 29, 2025 9:13 PM

views 49

नौवहन क्षेत्रामुळे देशाच्या विकासाला चालना मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नौवहन क्षेत्रामुळे देशाच्या विकासाला चालना मिळत असून भारताच्या नौवहन सामर्थ्यावर जगाचा विश्वास आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र  मोदी यांनी केलं. मुंबईत सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातल्या प्रतिनिधींच्या परिषदेला ते आज संबोधित करत होते. मागच्या  दशकभरात नौवहन क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन झालं असून व्यापार आणि बंदरे पायाभूत सुविधांना चालना मिळाली असं प्रधानमंत्री म्हणाले. सरकारनं नौवहन क्षेत्रात सुधारणांसाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत, शतकभर जुने कायदे बदलून २१ व्या शतकातले आधुनिक कायद...

October 29, 2025 9:10 PM

views 122

महाराष्ट्रात, आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्याबाबत कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे महाराष्ट्रात, आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाहीत असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. काही अपवाद वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार घेतल्या जातात. त्यासाठी व्हीव्हीपॅट जोडणीची सुविधा असलेली मतदान यंत्रं विकसित करण्याबाबत देशातील सर्व राज्य निवडणुक आयोगांची टेक्निकल इव्हॅल्यूशन कमिटी अभ्यास करत आहे, तिचा अहवाल अद्याप न आल्यानं व्हीव्हीपॅटचा वाप...

October 29, 2025 3:23 PM

views 67

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक, मुख्यमंत्र्यांची भूमिका

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार पहिल्या दिवसापासून सकारात्मक आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी आज मांडली. शेतकरी नेते बच्चू कडू यांनी इतके विविध प्रश्न मांडलेले आहेत, की फक्त आंदोलनाच्या माध्यमातून ते सोडवता येणार नाहीत, त्यावर चर्चा करून रोडमॅप तयार करावा लागेल, त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं. आंदोलनात झालेल्या गर्दीमुळे सामान्य नागरिकांना त्रास झाला, त्यामुळे त्यांनी असे प्रकार टाळावेत, रेल रोकोसारखी आंदोलनं करू नये, चर्चेसाठी  यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी ...

October 28, 2025 7:23 PM

views 177

नागपूरमध्ये शेतकरी संघटनांचं ‘महाएल्गार’ आंदोलन

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना ६ हजार रुपये मानधन, तसंच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या हक्कांसाठी नागपूरमध्ये आज राज्यभरातील शेतकरी संघटना महाएल्गार आंदोलन करत आहेत. आंदोलनात शेतकरी, दिव्यांग, मच्छिमार, मेंढपाळ सहभागी झाले आहेत. या आंदोलनात माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुध्दा सहभागी झाले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू जमलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निवास असलेल्या रामगिरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काँग्रेससह अनेक शे...

October 28, 2025 7:02 PM

views 80

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी ११ हजार कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी आणखी ११ हजार कोटी रुपये पुढच्या १५ दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली.   राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सुमारे ३२ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. त्यापैकी आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचं वितरण केलं आहे. आणखी ११ हजार कोटी रुपये वितरित करायला आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता दिली असून,  ही मदत पुढच्या १५ दिवसांत ...

October 28, 2025 6:58 PM

views 91

विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता

विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार व्हीएमयू अर्थात विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट  गठित करण्यात येणार आहे. नागरिकांकडून अभिप्राय मागवून त्यांचं कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विश्लेषण करून दस्तावेज तयार केलं जाईल. या अंतर्गत १६ संकल्पना आणि शंभर उपक्रम निश्चित केले जाणार आहेत. शाश्वत नागरी आणि शहरी विकास, प्रगतीशील शेती, सर्व...

October 21, 2025 3:07 PM

views 59

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे  नुकसानी  झालेल्या  शेतकऱ्यांना आता ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार आहे. याकरता  विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.   यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना सुमारे ८ हजार १३९ कोटी रुपये इतक्या रकमेचं अर्थसहाय्य वितरित करण्याचे  शासन निर्णय जारी झाले आहेत.   छत्रपती संभाजीनगर वि...

October 20, 2025 7:04 PM

views 52

आरोग्य योजनांच्या एकत्रीकरणासाठी राज्यात ‘वॉर रूम’ची स्थापना

राज्यातल्या विविध आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली  प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने शासन वॉर रूम स्थापन करणार आहे. हा विशेष कक्ष मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली काम करणार असून अध्यक्षपदी सेवानिवृत्त आयए एस अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झाली आहे.   एकाचवेळी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ एका रुग्णाकडून घेतला जाण्याचे प्रकार रोखण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचललं असून राज्य आणि केंद्रसरकारच्या सर्व आरोग्य योजनांविषयी माहिती, मार्गदर्शन आणि म...