November 8, 2025 8:18 PM

views 99

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रमुख प्रचारकांची संख्या दुप्पट

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या प्रमुख प्रचारकांची संख्या २० वरून वाढवून ४० करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून विविध पक्षांकडून ही मागणी होत होती. राजकीय पक्षांना प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागेल.

November 8, 2025 6:25 PM

views 61

शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठीच्या मतदार याद्या तयार करायची प्रक्रिया सुरू

निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागातले पदवीधर मतदारसंघ, तसंच पुणे आणि अमरावती विभागातल्या शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठीच्या मतदार याद्या नव्यानं तयार करायची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी नागरिकांना mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येतील. २५ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना १० सप्टेंबरपर्यंत त्यावर दावे आणि हरकती सादर करता येतील. अंतिम मतदार याद्या ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध ...

November 6, 2025 7:36 PM

views 37

Maharashtra Local Body Election: आचारसंहितेत सूट देण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेत सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांच्या छाननीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत या समितीची गरज व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार वाघमारे यांनी हे निर्देश दिले आहेत.

November 5, 2025 8:01 PM

views 67

स्टारलिंक आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार

स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात आज सामंजस्य करार झाला. या करारामुळे राज्यातल्या दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणं सुलभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. स्टारलिंक महाराष्ट्राशी भागीदारी करत असल्याने डिजीटल दरी मिटणार आहे. प्रत्येक शाळा, आरोग्य केंद्र आणि गाव आता डिजिटल संपर्कात येणार आहे,  असं मुख्यमंत्री म्हणाले. स्टारलिंकशी करार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे.  &...

November 5, 2025 3:18 PM

views 21

राज्यात केंद्रीय पथकानं केली अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकानं आज केली.   सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात बडकबाळ आणि हत्तूर आणि उत्तर सोलापूरच्या तिऱ्हे आणि शिवणी या गावांना भेट देऊन शेती, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा आढावा केंद्रीय पथकानं घेतला.   बीड जिल्ह्यात केंद्रीय पथकानं आज पाहणीला सुरुवात केली. इथं ११ तालुक्यांमध्ये पिकांसह जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसंच पशुधन आणि घरांनाही मोठा फटका बसला आहे.   अहिल्य...

November 4, 2025 7:43 PM

views 2.2K

नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींचं २ डिसेंबरला मतदान, मतमोजणी ३ डिसेंबर

राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. यानुसार येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून  उमेदवारी अर्ज भरता येणार असून १७ नोव्हेंबरला अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. १८ नोव्हेंबरला उमेदवार अर्जांची छाननी केली जाईल, २१ नोव्हेंबरला अर्ज माघारी घेता येईल तसंच २६ नोव्हेंबरला उम...

November 4, 2025 7:49 PM

views 43

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महायुती सज्ज-गिरीश महाजन

राज्यात होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महायुती सज्ज असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. महाजन यांच्या हस्ते आज नंदुरबार जिल्हा भाजपा कार्यालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन  झालं त्यावेळी ते बोलत होते. आघाडी राज्यातल्या दोन तृतीयांश म्हणजेच दोनशे पेक्षा अधिक नागरपालिकांवर विजय मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदार यांद्यामधला घोळ म्हणजे विरोधकांचा खोटं नेरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली.  हा प्रयत्न यशस्वी होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त ...

November 4, 2025 3:10 PM

views 125

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत २,३९९ आजारांचा समावेश करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजना अंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करायला राज्य मंत्रीमंडळानं आज मान्यता दिली आहे. त्यानुसार आता या योजनेत २ हजार ३९९ आजारांचा समावेश केला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. आयुष्मान कार्ड तयार करणाऱ्या आणि वितरीत करणाऱ्या आघाडीच्या फळीतल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करायलाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली.   सार्वजनिक आर...

November 4, 2025 2:40 PM

views 43

मालकीच्या जागांवर इंधन विक्री सुरू करणार, परिवहन मंत्र्यांची माहिती

उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळ राज्यभरात आपल्या मालकीच्या २५०पेक्षा जास्त जागांवर इंधन विक्री सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल, डीझेलबरोबरच सीएनजी तसंच इलेक्ट्रिक चार्जिंग उपलब्ध असतील.    दरम्यान, एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची थकबाकीची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. एस टी महामंडळानं आज प्रसिद...

November 3, 2025 4:00 PM

views 31

सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.  दिंडोरी तालुक्यातील जानोरी, कोरटे परिसरातल्या भात पिकांच्या नुकसानीची त्यांनी आज पाहणी केली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना नुकसानीबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक येणार असल्याचंही...