November 17, 2025 7:41 PM

views 26

शासकीय सेवांच्या भर्ती परीक्षांच्या निकालानंतर ४ दिवसात नियुक्तीपत्रं मिळणार

शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर किमान चार दिवसात संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र द्यावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. वर्षा निवासस्थानी सुशासनासाठी प्रशासकीय सुधारणांबाबत आयोजित सादरीकरण बैठकीत ते बोलत होते. दरवर्षीचा आढावा घेत जानेवारी महिना संपेपर्यंत उपलब्ध पदोन्नतींच्या जागांनुसार ७५ टक्के पदोन्नती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.    नागरिक केंद्रित, जबाबदार आणि सुशासनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय सुधारणा केल्य...

November 16, 2025 3:00 PM

views 21

मराठवाडा, विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट राहील -हवामान विभाग

मराठवाडा, विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पूर्व राजस्थान, झारखंड आणि उत्तरप्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी आज थंडीची लाट राहील, तर तामिळनाडू आणि करैकलमध्ये आज जोरदार ते अती जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राजधानी दिल्ली परिसरात हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून, हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं दिल्ली आणि आसपासच्या भागात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेचा तिसरा टप्पा लागू केला आहे.  

November 15, 2025 6:55 PM

views 50

राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन

आदिवासी संस्कृती जपण्यासाठी सरकारनं अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे आणि अनेक नव्या योजना आखल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात  दिली. स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीचं औचित्य साधून आयोजित राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्धाटन समारंभात ते  बोलत होते.   महाराष्ट्रात एक कोटी २५ लाख आदिवासी असून १६ जिल्ह्यात त्यांच्या ४५ जमाती आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. आदिवासींना जल, जमीन आणि जंगलापासून न तोडता त्यांना संरक्षण देण्...

November 14, 2025 2:43 PM

views 41

वित्तीय समावेशन आणि सामाजिक सुरक्षा योजनांच्या राष्ट्रव्यापी अंमलबजावणी अभियानात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

वित्तीय समावेशन आणि सामाजिक सुरक्षा योजनांच्या राष्ट्रव्यापी अंमलबाजवणी अभियानात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती या अभियानासंदर्भातल्या अंतिम प्रगती अहवालात देण्यात आली आहे.  या अभियानाच्या काळात महाराष्ट्रात सुमारे  १ कोटी ४० लाख लाभार्थ्यांपर्यंत विविध सरकारी योजनांचे लाभ पोहचवण्यात आले. या यादीत उत्तर प्रदेश प्रथम तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहेत.    वित्तीय समावेशन आणि सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं १ जुलै ते ३१ ऑक्...

November 13, 2025 8:01 PM

views 7.9K

उमेदवारी अर्ज आणि शपथत्रातली माहिती भरणं आवश्यक, कागदपत्र अपलोड करायची गरज नाही-निवडणूक आयोग

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज आणि शपथत्रातली माहिती भरणं आवश्यक असून त्यासोबत कोणतंही कागदपत्र अपलोड करायची गरज नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र यांच्या छापील प्रतीवर सही करून आवश्यक कागदपत्रांसह ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करावं असं निवडणूक आयोगानं सांगितलं. राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालीआहे. हे अर्ज maha s e c e l e c.in या संकेतस्थळावर भरायच...

November 12, 2025 2:41 PM

views 104

Maharashtra: कृषी विभागाच्या बोधचिह्न आणि घोषवाक्याचं अनावरण

राज्याच्या कृषी विभागाच्या बोधचिह्न आणि घोषवाक्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल झालं. ‘शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी’ असं घोषवाक्य कृषी विभागाने स्वीकारलं आहे. राज्यभरातून स्पर्धकांनी पाठवलेल्या सतराशे घोषवाक्यांमधून या घोषवाक्याची निवड करण्यात आली आहे. तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक शेतीसाठी सरकार वचनबद्ध आहे हे या बोधचिह्नामधून दिसून येतं,  असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हे बोधचिह्न आणि घोषवाक्य कृषी विभागाच्या सर्व उपक्रमांमधे वापरलं जाईल, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे...

November 12, 2025 1:40 PM

views 126

दिल्ली स्फोट प्रकरणी महाराष्ट्रातून एका संशयिताला अटक

दिल्ली स्फोट प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मुंब्रा इथून एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वस्तूंचा तपास केला जात असल्याचं एटीएसने सांगितलं.

November 11, 2025 7:06 PM

views 58

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय

राज्यातल्या न्यायालयांचा परिसर, तसंच न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त ८ हजार २८२ सुरक्षारक्षक नियुक्त करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला. हे सुरक्षारक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून घेतले जातील. त्यांच्या वेतनासाठी आवश्यक ४४३ कोटी २४ लाख ८४ हजार ५६० रुपयांच्या तरतुदीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली.   पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवायलाही मं...

November 10, 2025 3:01 PM

views 54

राज्यात थंडीची चाहूल

राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून अनेक जिल्ह्यांत हंगामातल्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईच्या हवेतली आर्द्रता कमी झाली असून गारवा वाढला आहे. कोकणात रायगड जिल्ह्यात थंडीला सुरुवात झाली असून वातावरण आल्हाददायक झाल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. नाशिक शहरातही दररोज तापमानाचा पारा घसरत असून आज सकाळी १० पूर्णांक ८ दशांश अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून आज सकाळी ८ पूर्णांक ५ दशांश अंश सेल्सियस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली. अमरावती ...

November 9, 2025 7:04 PM

views 17

राज्याच्या काही भागात थंडीची चाहूल

राज्याच्या काही भागात थंडीची चाहूल लागली आहे. मुंबईत गेले दोन दिवस रात्रीच्या तापमानात घट दिसून आली. येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.