November 28, 2025 3:10 PM

views 79

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचाराला वेग

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून विविध पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालना, वाशीम, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विविध प्रचारसभांना संबोधित करत आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे, अहिल्यानगर आणि रायगड जिल्ह्यात प्रचार करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा नाशिकमध्ये सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठीचा वेळ वाढवण्यात आली असून १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता प्रचार बंद होईल, असं पत्र...

November 28, 2025 3:11 PM

views 919

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश…

राज्यात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, तिथं ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची अधिसूचना जारी करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य निवडणूक आयोगाला दिले. तसंच, ज्या निवडणुकांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची अधिसूचना जारी झालेली आहे, त्या निवडणुकांचा निकाल या याचिकांवरच्या निकालावर अवलंबून राहील, असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं स्पष्ट केलं.   राज्यात एकंदर २४६ नगरपरिषदा आणि ४२ नग...

November 27, 2025 8:25 PM

views 22

येत्या २ वर्षांत एक कोटी लखपती दीदी बनवण्याचं सरकारचं ध्येय – मुख्यमंत्री

राज्यात येत्या २ वर्षांत एक कोटी लखपती दीदी बनवण्याचं ध्येय सरकारनं ठेवलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज त्यांनी लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता २ हजार ४०० आजारांचा समावेश असून काही गंभीर आजारांवर पाच लाखांपेक्षा जास्त खर्चही राज्य सरकार करणार असल्याची माहि...

November 27, 2025 7:09 PM

views 14

राज्यातल्या ५ जिल्ह्यांमधली ७५ गावं, स्मार्ट आणि इंटलिजंट व्हिलेजेस म्हणून विकसित होणार

राज्यातल्या ५ जिल्ह्यांमधली ७५ गावं, स्मार्ट आणि इंटलिजंट व्हिलेजेस म्हणून राज्य सरकार विकसित करणार आहे. नागपूरमधल्या काटोल तालुक्यातली १०, अमरावतीमधल्या चांदूरबाजारमधली २३, हिंगोलीतल्या कळमनुरीतली ११, बारामतीमधली १० आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी तालुक्यातल्या २१ गावांचा यात समावेश आहे. यासंदर्भातला शासन आदेश आज सरकारनं जारी केला. नागपूरमधल्या सातनवरीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या प्रकल्प राबवण्यात आला. याअंतर्गत शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, नवीकरणीय ऊर्जा, ई-शासन, डिजिटल संपर्क क्षेत्रातले व...

November 27, 2025 6:44 PM

views 49

शेतीशी निगडीत कर्जवसुलीला स्थगिती!

महाराष्ट्रात यंदा जून ते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुढच्या एक वर्षासाठी शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच सर्व बाधित तालुक्यांच्या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्जाचं मध्यम मुदत कर्जात रुपांतरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सहकार विभागाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे.   राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यात ३२ हजार कोटींचा विशेष मदतनिधी जाहीर केला होता; त्याचवेळी ...

November 26, 2025 7:13 PM

views 137

महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करायला मुदतवाढ

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करणं, तसंच अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत आता २७ नोव्हेंबर ऐवजी ३ डिसेंबर झाली आहे, हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करण्याची मुदत ५ डिसेंबर ऐवजी १० डिसेंबर, मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिध्द करण्याची मुदत ८ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबर आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रस...

November 22, 2025 4:04 PM

views 14

राज्याच्या काही भागात थंडीचा जोर कायम

राज्याच्या काही भागात थंडीचा जोर कायम आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

November 18, 2025 8:08 PM

views 17

राज्याच्या काही भागात गारठा वाढला

राज्याच्या काही भागात गारठा वाढला असून आज धुळ्यात सर्वात कमी, ६ पूर्णांक २ दशांश अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलं. नाशिक जिल्ह्यात निफाड इथं ६ पूर्णांक ९, तर  नाशिक शहरात ९ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस दशांश अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.    उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पारा १० अंश सेल्सिअसवर आला आहे. दिवसाही थंडी जाणवत असल्यानं नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. तर बाहेर पडताना उबदार कपडे घालून निघालेले दिसत आहेत.   गेल्या चोवीस तासात मराठवाड्या...

November 18, 2025 6:46 PM

views 15

देशभरात ५० कोटी ९७ लाखापेक्षा जास्त नोंदणी अर्ज वितरित

मतदारयाद्यांचं विशेष सखोल पुनरिक्षण करण्याच्या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरात ५० कोटी ९७ लाखापेक्षा जास्त नोंदणी अर्ज वितरित करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. पुनरिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात  ५१ कोटी मतदारांची पडताळणी असून त्यातल्या ९८ पूर्णांक ५४ शतांश टक्के मतदारांना हे अर्ज मिळाले आहेत. ९ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशात हा टप्पा राबवला जात असून उत्तर प्रदेशात १५ कोटी तर पश्चिम बंगालमधे ७ कोटी मतदारांना  हे अर्ज दिले आहेत. ४ नोव्हेंबरपासून सुरु झालेला पुनरिक्षणाचा हा टप्पा...

November 17, 2025 7:52 PM

views 448

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करण्यासाठी मुदतवाढ!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी राज्य सरकारनं ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे आणि पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातल्या महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांकडे जमा करावी, असं आवाहन महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.