July 25, 2024 7:14 PM
17
पावसामुळे राज्यात जनजीवन विस्कळीत
राज्याच्या विविध भागांमध्ये आज पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं. पुण्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग केल्यामुळे पुणे शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. सिंहगड रस्त्यावर एकता नगरमध्ये NDRF आणि लष्कराच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीची पाहणी केली. दहावी आणि बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना पावसामुळे फेरपरीक्षेला उपस्थित राहता आलं नाही, त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल, असं त्यांनी वार्ताहर परिषदेत सा...