July 15, 2024 11:42 AM July 15, 2024 11:42 AM
13
राज्याच्या बहुतांश भागात पावसाची संततधार, कोकणात जनजीवन विस्कळीत
राज्याच्या बहुतांश भागात कालही पावसाची संततधार सुरू होती. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी आणि विन्हेरे या स्थानकांदरम्यान काल दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या असून, अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबईकडे जाणार्या तेजस एक्सप्रेस,जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या रत्नागिरी स्थानकात सायंकाळी पावणेसहापासून थांबवण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व शाळा-महाविद्...