September 24, 2024 9:24 AM

views 26

यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार

राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्री समितीची बैठक झाली; त्यावेळी ते बोलत होते.

September 23, 2024 7:28 PM

views 20

मुंबईसह राज्याच्या विविध जिल्ह्यांत जोरदार पावसाची हजेरी

राज्यात कालपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाच्या जोरदार सरी अधूनमधून येत आहेत. रत्नागिरीत आज  दुपारपासून मळभ होतं मात्र संध्याकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली.  सांगली जिल्ह्यात तासगाव, पलूस, मिरज, कवठेमहांकाळ आणि वाळवा तालुक्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. अहमदनगर शहरातही संध्याकाळी जोरदार पाऊस झाला.   येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी साेसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात ...

September 23, 2024 2:52 PM

views 20

निवडणूक आयोगाचं पथक २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर

निवडणूक आयोगाचं पथक २६ ते २८ सप्टेंबर या दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. या काळात राज्यातले विविध राजकीय पक्ष, राज्य निवडणूक आयोग, सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत आयोगाचं पथक बैठक घेणार  आहे. २८ सप्टेंबरला मुंबईत आयोगाची वार्ताहर परिषद होईल. यात राज्यातल्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे.   

September 23, 2024 3:50 PM

views 23

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बंदची हाक

मराठा आरक्षणासाठी आंदोलन  सुरु असून  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेले काही दिवसांपासून आंतरवली सराटीत उपोषण करत आहेत. तसंच धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाचे नेते आणि पदाधिकारीही वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. सकल मराठा समाजाचे काही नेत्यांनी पंढरपुरात  येऊन  धनगर समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण करत असलेल्या धनगर नेत्यांची भेट घेतली. जरांगे पाटील यांनी धनगर एसटी आरक्षणाला आपला पाठिंबा याआधीच जाहीर केला आहे.    नांदेडमधल्या सकल मराठा समाजाने आज  नांदेड बंदची हाक दिली आहे. नांदेड बंदच्...

September 22, 2024 7:22 PM

views 35

महायुतीत रिपब्लिकन पक्षाला बारा जागा देण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला बारा जागा देण्याची मागणी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. महायुतीतल्या तीन प्रमुख पक्षांनी प्रत्येकी चार जागा रिपाईला द्याव्यात, असं ते म्हणाले.   विदर्भातल्या उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड, वाशिम या मतदारसंघांसाठी आठवले आग्रही आहेत. राज्यात लढवणार असलेल्या एकूण जागांची यादी दोन दिवसांत आपण महायुतीला देऊ, या सर्व जागा आमच्याच चिन्हावर लढवू, असंही आठवले यांनी स्पष्ट केलं.

September 21, 2024 2:34 PM

views 20

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २४ सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २४ सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचं भाजपाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी ते नाशिक आणि कोल्हापूरला भेट देतील.

September 12, 2024 1:07 PM

views 39

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात ४ दिवसांत जोरदार पाऊसाचा अंदाज

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात काही ठिकाणी आगामी चार दिवसांत जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. तसंच बिहार, ओडिशा, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा इथे उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य भारत, कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पुढच्या आठवड्यात होऊ शकेल.

September 11, 2024 2:29 PM

views 19

महाराष्ट्रात विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात विदर्भात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.     छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी सहा दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले. आता धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.   गोंदिया जिल्ह्यात काल रात्री ढगफुटी सारखा पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे....

September 8, 2024 7:07 PM

views 26

राज्यात सोयाबीन, उडीद पिकांसाठी किमान हमीभावानं खरेदी केंद्रं सुरू करायला केंद्र सरकारची मान्यता

महाराष्ट्रासह कर्नाटकात ९० दिवसांसाठी किमान हमीभावानं सोयाबीन आणि उडीद या दोन पिकांसाठी खरेदी केंद्रं सुरू करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे. या निर्णयाबद्दल कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

September 8, 2024 11:59 AM

views 13

राज्यातल्या दहा जिल्ह्यात पिकांचं नुकसान, आठ लाख हेक्टरवरील पिकं बाधित झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल

कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार राज्यातील दहा जिल्हयांत पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. यामध्ये खरिपातील सुमारे आठ लाख 48 हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झाली असून, नुकसानाचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. कृषी विभागाच्या 24ऑगस्टपासून आतापर्यंतच्या अहवालानुसार खरीप हंगामातील पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, ज्वारी पिकांचं आणि कांदा, भाजीपाल्याचंही नुकसान झालं आहे. अतिपावसामुळं पिकांचं नुकसान झालं असेल तर शेतक-यांनी पीक विमा...