October 19, 2024 2:48 PM

views 20

‘हरियाणा, महाराष्ट्रात भाजपने क्रीमीलेअर आणि अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाचा चुकीचा निर्णय लागू केला’

हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपने सर्वोच्च न्यायालयाचा क्रीमीलेअर आणि अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाचा चुकीचा निर्णय लागू केल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आपल्या  ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही पक्षांना अनुसूचित जातींमध्ये विभागून त्यांचे एक होणे थांबवायचे आहे. निवडणूकीच्या काळात लोकांमध्ये फूट पाडून भाजप आणि काँग्रेसला राजकीय लाभ घ्यायचा आहे. असंही ते म्हणाले. 

October 18, 2024 10:56 AM

views 24

विधानसभा निवडणूक : काळ्या पैशाच्या वापराची नागरिक करणार तक्रार

राज्यात होणाऱ्या  विधानसभा निवडणूक प्रचारात काळ्या पैशाचा वापर होत असल्याचं नागरिकांच्या  निदर्शनास आल्यास त्यांनी आयकर विभागाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन आयकर अधिकाऱ्यांनी केलं आहे. निवडणुकीत वापरला जाणारा काळा पैसा, रोख रकमेची वाहतूक किंवा वाटप, अशा  संशयास्पद गोष्टी नजरेस पडल्यास नागरिकांनी थेट आयकर विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा मेल आयडी वर संपर्क करावा अथवा ९४०३३९०९८० या व्हाट्सअप क्रमांकावर विडिओ किंवा छायाचित्र पाठवावं असं आवाहन आयकर विभागाचे नागपुरातील उप आयकर निदेशक अनिल खडसे...

October 17, 2024 6:51 PM

views 36

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार आणि राजकीय पक्षांना गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी करावी लागणार

महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांच्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी करावी लागणार आहे. भारत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबत सविस्तर निर्देश आणि प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी विहीत नमुने देखील दिले आहेत. उमेदवाराविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर, Know Your Candidate या लिंकवर उपलब्ध असेल.

October 17, 2024 8:48 AM

views 18

पक्ष किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर लक्ष ठेवणार असल्याचा निवडणूक आयोगाचा इशारा

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या काळात राजकीय पक्ष किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष असणार आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या तक्रारी C-VIGIL ऍपवर नोंदवू शकतात, अशी माहिती अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली.     आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात जर काही शासन आदेश जारी झाले असतील किंवा जाहिराती प्रसिद्ध झाल्या असतील तर त्याचीही चौकशी केली जाईल,असं कुलकर्णी यांनी संगीतलं.निवडणुकीत उ...

October 16, 2024 3:08 PM

views 25

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं रिपोर्टकार्ड प्रसिद्ध

महाराष्ट्रात काल विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीने आज सरकारच्या आजपर्यंतच्या कामांचा आढावा घेणारं प्रगती पुस्तक प्रकाशित केलं.   महाविकास आघाडीने अडीच वर्षांत अनेक प्रकल्पांमध्ये अडथळे आणले. पण, महायुतीचं सरकार आल्यानंतर विकासाला गती मिळाली, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महायुतीची संयुक्...

October 16, 2024 3:12 PM

views 17

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात

  राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने काल जाहीर केला. त्यानुसार राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात झाली आहे.        वाशिम जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काल वार्ताहर परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यावेळी निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती देण्यात आली. आचारसंहिता सुरू झाल्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी जाहिरात फलक हटवावेत तसंच नियमांचं काटोकोर पालन करावं  असे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले.        अकोला जिल्ह्यात निवडणूक मुक्त वातावरणात व्हावी ...

October 15, 2024 8:53 AM

views 18

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले हे १९ महत्त्वाचे निर्णय

मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पथकरातून सवलत दिल्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाला द्याव्या लागणाऱ्या भरपाईसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला.   दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदी जोड योजना, दमणगंगा-वैतरणा-गोदावदी नदी जोड योजना तसंच ...

October 14, 2024 7:17 PM

views 17

विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी म्हणूनच निवडणूक लढवणार – नाना पटोले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत काँग्रेसची बैठक झाली. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीबद्दल या बैठकीत चर्चा झाली असून महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर सांगितलं.

October 14, 2024 7:22 PM

views 25

राष्ट्रीय जलपुरस्कारांमधे महाराष्ट्राला विविध विभागात मिळून ५ पुरस्कार

पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमधल्या उत्कृष्ट महानगरपालिका श्रेणीत पुणे महानगर पालिकेला तिसरा क्रमांक जाहीर झाला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी नवी दिल्लीत या पुरस्कारांची घोषणा केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २२ ऑक्टोबरला नवी दिल्लीत या पुरस्कारांचं वितरण करतील. उत्कृष्ट राज्यांच्या श्रेणीत ओडिशा प्रथम, उत्तर प्रदेश द्वितीय तर गुजरात आणि  पुद्दुचेरीला संयुक्तरित्या तिसरा पुरस्कार मिळाला आहे.    सिव्हील सोसायटी श्रेणीत पुण्यातल्या बायफ विकास संशोधन फाऊंडेशनला पहिला आणि ना...

October 14, 2024 3:01 PM

views 18

विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसची दिल्लीत बैठक

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसची दिल्लीत बैठक होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. तसंच महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेतेही उपस्थित राहतील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. हरियाणा विधानसभेत झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्रातल्या निवडणुकीसाठी रणनिती आखण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे.