December 5, 2025 9:47 AM

views 41

‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम

महाराष्ट्रानं 'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेत विश्वविक्रम केला आहे. महावितरणनं एकाच महिन्यात 45 हजार 911 सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला आहे. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली असून गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथे होणार आहे. राज्यात साडेदहा लाख सौर कृषीपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

December 4, 2025 7:05 PM

views 95

संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे राज्य निवडणूक आयुक्तांचे आदेश

महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधल्या संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. राज्यातल्या सर्व महानगरपालिका आयुक्तांची आज दूरस्थ पद्धतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाघमारे यांनी हे आदेश दिले आहेत. प्रारुप मतदार याद्यांवरच्या हरकती आणि सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा, प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका निदर्शनाला आल्या तर तक्रारींची वाट न पाहता त्या दुरुस्त कराव्यात असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत...

December 3, 2025 7:38 PM

views 20

कच्च्या कैदेत असलेल्या आरोपीला हजर करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

कच्च्या कैदेत असलेल्या एका आरोपीला पन्नासहून अधिक वेळा न्यायालयात हजर करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राज्यातल्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणी ८५ सुनावण्या झाल्या असून त्यापैकी ५५ सुनावण्यांमध्ये संबंधित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं नव्हतं. ही परिस्थिती भयंकर आणि धक्कादायक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या पीठाने नोंदवलं आहे. २०२१मध्ये झालेल्या या प्रकरणात हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल एका आरोपीच्या जामीन अर्जावर...

December 3, 2025 2:58 PM

views 481

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर, रविवारीही कामकाज सुरू

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ८ डिसेंबरपासून नागपूर इथं सुरूवात होणार आहे. मुंबईत विधानभवन इथं आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली, यात हा निर्णय झाला. हे अधिवेशन १४ डिसेंबरपर्यंत चालेल. १३ डिसेंबर, शनिवारी आणि १४ डिसेंबर, रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशीही सभागृहाचं कामकाज होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे उपस्थित होते.

December 3, 2025 2:48 PM

views 30

राज्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव

राज्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.    अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं प्रस्तावच पाठवला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. संसदेच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही बाब उघड झाल्याचा दावाही विरोधकांकडून केला जात होता. मात्र, तारांकित प्रश्न हे ३५ दिवसांपूर्वी दाखल केले जातात, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं आणि कृषीबद्दलचा प्रस्ताव अंतिम टप्प...

December 3, 2025 1:09 PM

views 261

मध्य महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये थंडीची लाट !

मध्य महाराष्ट्र आणि पंजाबमधे आज थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर केरळ, माहे, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथंल्या काही भागात जोरदार पाऊस पडेल  असा अंदाज आहे. आंध्रप्रदेशात आज विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. तर आसाम, मेघालय, हिमाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम , त्रिपुरा आणि ओदिशामधे धुक्याची चादर पसरलेली असेल.    दितवाह चक्रीवादळाचं कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झालं आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या उत्तर भागात संततधार पाऊस सुरू आहे. 

December 1, 2025 3:02 PM

views 136

निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला राजकीय पक्षांचा विरोध

राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीसाठी प्रचार करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे. विविध पक्षांचे नेते मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज रात्री १० वाजता हा प्रचार संपेल.    दरम्यान, राज्यातल्या काही मतदारसंघांमधल्या निवडणुकांबाबत काही जणांनी न्यायालयात धाव घेतल्यानं इथल्या निवडणुका पुढं ढकलायचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. हा निर्णय चुकीचा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना म्ह...

November 30, 2025 7:14 PM

views 22

गेल्या २४ तासात कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट

गेल्या २४ तासात कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाली. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किंचित घट झाली. येत्या २ दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता  

November 30, 2025 7:48 PM

views 155

राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराला जोर

राज्यातल्या २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार संपायला २ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळं राज्यभरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. तसंच प्रशासनाकडून २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची तयारी सुरू असून काही ठिकाणी टपाली मतदानाला सुरुवात होत आहे.   बीड जिल्ह्यातल्या सहा नगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातल्या बीड, गेवराई, माजलगाव, धारूर, परळी आणि अंबाजोगाई या सहा नगरपरिषदांमधे दोन तारखेला मतदान होणार आहे. परळी नगरपरिषदेतले दोन नगर...

November 29, 2025 6:53 PM

views 64

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात प्रचाराला जोर

राज्यातल्या २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार संपायला २ दिवस शिल्लक आहे. त्यामुळं राज्यभरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी आज चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रापूर इथं प्रचारसभा घेतली. विकास आराखडा घेऊन भाजपा जनतेकडे जात आहे. भाजपाकडे निती, नियत आणि निधी असल्याने भाजपाच्या उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन  मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. याशिवाय वाशिम आणि गडचिरोली इथं मुख्यमंत्र्य...