December 8, 2024 7:02 PM

views 12

विरोधकांचा शपथविधीवरचा बहिष्कार मागे, आतापर्यंत २८० सदस्यांचा शपथविधी

राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी १०६ नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. काल १७३ नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली होती. महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या वापराला निषेध म्हणून काल शपथ घ्यायला नकार दिला होता. आज अधिवेशनाचं कामकाज सुरु होण्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात बहिष्कार मागे घेऊन सदस्यत्वाची शपथ घेण्याचा निर्णय झाला.    शपथविधीनंतर सभागृहाचं काम...

December 6, 2024 7:41 PM

views 15

राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी

वाशीम जिल्ह्यात काही दिवसापासून ढगाळ वातावरण असून आज दुपारी बारा वाजता मंगरूळपीर, मानोरा आणि कारंजा या तीन तालुक्यांत काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसानं मंगरूळपिर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोयाबीन भिजलं. सोयाबीनला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभाव मिळत असल्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. मराठवाड्यात आज सर्वत्र पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यात पहाटेपासून ढगाळ वातावरण असून, मध्य...

December 5, 2024 8:12 PM

views 27

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची शपथ

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडनवीस यांनी आज शपथ घेतली. मुंबईत आझाद मैदानात झालेल्या समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी फडनवीस यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.    यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, शिवराजसिंह चौहान, जेपी नड्डा, रामदास आठवल...

December 5, 2024 8:11 PM

views 24

७ ते ९ डिसेंबर या कालावधीत विधानसभेचं विशेष अधिवेशन

राज्याला स्थिर आणि लोकाभिमुख सरकार देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या वेळापूर्वी वार्ताहर परिषदेत दिली. ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत विशेष अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करून राज्यपालांचं अभिभाषण व्हावं, यासाठीची शिफारस राज्यपालांना केली असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.   महायुतीच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करायच्या आश्वासनाचा पुनरुच्चार त्यांनी केला. नव्या विधिमंडळात विरोधकांची संख्या कमी असली, तरी त्यावरून त्यांचं मूल्यम...

December 4, 2024 7:31 PM

views 20

महायुतीचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा

महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडनवीस, अजित पवार, आणि इतर नेत्यांनी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या एकूण २३७ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं. यावेळी केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन, आणि भाजपा नेते विजय रूपाणी देखील उपस्थित होते.   राज्यपालांकडे जाण्याआधी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांची बैठक झाली. त्यानंतर, हे तिन्ही नेते...

December 4, 2024 8:18 PM

views 25

नवं सरकार राज्याच्या प्रगतीसाठी काम करेल – देवेंद्र फडणवीस

महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडनवीस, एकनाथ शिंदे  आणि अजित  पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची माहिती दिली. महायुतीत  आतापर्यंत सर्व निर्णय एकत्रितपणे घेतले गेले असून यापुढेही एकत्र राहून निर्णय घेऊ असं भाजपा विधिमंडळ गट नेते देवेंद्र फडनवीस यांनी यावेळी सांगितलं.    महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा उल्लेख करत फडनवीस यांनी जनतेचे तसंच भाजपा नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले य...

December 4, 2024 3:24 PM

views 23

मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी जागतिक बँकेकडून महाराष्ट्राला नव्यानं कर्ज

विकास प्रक्रियेत मदत करण्यासाठी जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने महाराष्ट्राला ३ डिसेंबर रोजी नव्यानं कर्ज मंजुर केलं आहे. राज्यातल्या मागास जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या जागिक बँकेच्या उपक्रमाचा हा भाग आहे. विकासाची संधी निर्माण करणं, खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देणं हे याचं उद्दिष्ट आहे. ५० हजार कोटींची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. तरीही राज्याच्या जीडीपीपैकी पन्नास टक्के उत्पादन केवळ सात जिल्ह्यांमध्ये होतं. त्यामुळे...

December 3, 2024 7:42 PM

views 25

येत्या दोन दिवसात राज्यात पावसाची शक्यता

फेंजल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातल्या वातावरणावरही दिसून येत आहे. पुढच्या ४८ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात मात्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.

December 2, 2024 7:51 PM

views 12

येत्या बुधवारी भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक

राज्यात सरकारस्थापनेच्या दृष्टीने महायुतीच्या घटक पक्षांमधे आजपासून वाटाघाटी पुन्हा सुरु होतील. भाजपा विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपाच्या संसदीय मंडळानं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांची नेमणूक केली आहे. उद्या रात्री या दोन्ही निरीक्षकांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपा आमदारांची बैठक होणार आहे.    भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक येत्या ४ डिसेंबरला होणार असून त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी औपचारिक घोषणा होण्य...

December 1, 2024 7:15 PM

views 18

राज्यात येत्या 5 डिसेंबरला सरकार स्थापन होणार

महायुतीमध्ये कसलाही वाद नाही असं सांगत महाराष्ट्रात  येत्या गुरुवारी 5 डिसेंबर ला शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उपमुख्यमंत्री बनतील असं त्यांनी काल स्पष्ट केलं.  दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ५ डिसेंबरला मुंबईतल्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाजमाध्यमावरून दिली ...