December 15, 2024 7:38 PM

views 655

येत्या दोन दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता

गेल्या चोवीस तासात, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय तर किंचित घट झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं ६ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.    येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.    परभणी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढत असून आज सर्वाधिक नीचांकी ४ पूर्णांक ६ शतांश अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद...

December 15, 2024 7:28 PM

views 26

महाराष्ट्राला पुढे नेणं हेच महायुतीचं ध्येय – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्राला पुढे नेणं हेच महायुतीचं ध्येय आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या  विदर्भातल्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांचा मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यावर महामंडळाची पदं तात्काळ भरली जातील,  असं ते म्हणाले.    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या आमदारांना अडीच वर्षासाठी मंत्री पदाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इतर आमदारांना संधी मिळेल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. 

December 15, 2024 8:41 PM

views 47

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात ३३ कॅबीनेट आणि ६ राज्यमंत्र्यांचा शपथविधी

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आज ३३ कॅबीनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. नागपूर इथं राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि  गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. महायुतीच्या मागील सरकारच्या कार्यकाळातील मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावीत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांच्यासह तेरा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. पंकजा मुंडे, चंद...

December 15, 2024 8:42 PM

views 34

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अडीच वर्षासाठी मंत्रीपदाची संधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या आमदारांना अडीच वर्षासाठी मंत्री पदाची संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे आहे. नागपूरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या  विदर्भातल्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांचा मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. यामुळे इतर आमदारांना संधी मिळेल असं ते म्हणाले.

December 15, 2024 8:41 PM

views 30

मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षाचा बहिष्कार

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार घातला आहे.    महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची आज नागपुरात बैठक झाली, त्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचं विरोधी पक्षांनी वार्ताहर परिषदेत स्पष्ट केलं. विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते वेळी उपस्थित होते.  ...

December 10, 2024 3:24 PM

views 24

विधानसभा निवडणुकीच्या वेळी व्हिव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या पडताळणीबाबत सर्व प्रक्रियेचं पालन – निवडणूक आयोग

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या कोणत्याही पाच मतदान केंद्रावरच्या VVPAT चिठ्ठ्या मोजणं आवश्यक आहे. यानुसार २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी प्रत्येक मदारसंघातल्या प्रत्येकी पाच मतदान केंद्रावरच्या VVPAT चिठ्ठ्या मोजण्यात आल्या होत्या, असं निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. त्यावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते असंही यात म्हटलं आहे. या मोजणीनुसार २८८ मतदारसंघातल्या १ हजार ४४० V V PAT युनिटची मोजणी करून ते संबंधित कंट्रोल युनिट डाटाशी जुळवून पाहण्य...

December 10, 2024 9:41 AM

views 15

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

गेल्या आर्थिक वर्षामध्ये थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम स्थानी होता, असं महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. राज्य विधान मंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये राज्यपालांनी काल विधीमंडळाच्या संयुक्त सभागृहाला संबोधित केलं. सध्याच्या 2024-25 या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतही 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणुक महाराष्ट्रात झाली आहे. ही गुंतवणूक, गेल्या वर्षाच्या थेट परकीय गुंतवणुकीच्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचं राज्यपाल म्हणाले. राज्य...

December 9, 2024 7:57 PM

views 18

महाराष्ट्र हे असिमित ताकदीचं राज्य आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

महाराष्ट्र हे असिमित ताकदीचं राज्य आहे. आता आपण क्रमांक एक वर आहोत, म्हणून थांबू नका, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना आज सांगितलं. त्यांनी आज विधान भवनातल्या समिती सभागृहात या अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सरकारच्या आगामी काळातल्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली. केंद्र सरकारच्या सहकार्याचा राज्याच्या प्रगतीसाठी पुरेपूर वापर करून घेण्यासाठी अधिक समन्वय, पाठपुराव्याची व्यवस्था निर्माण करा, असं ते म्हणाले. पायाभूत सुविधांप्रमाणेच राज्या...

December 9, 2024 4:11 PM

views 15

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचं पुनरागमन

गेले काही दिवस उकाडा जाणवत असताना कालपासून राज्यात थंडीचं पुनरागमन झालं आहे. अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ हवामान तयार होऊन अवकाळी पाऊस पडला तसंच  तापमानात वाढ झाली होती. मात्र, उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे  मुंबईसह नाशिक, पुणे इत्यादी भागात थंडीचा जोर  वाढला आहे. मुंबईतील सांताक्रुज केंद्रावर तापमान १३ पूर्णांक ७ दशांश अंश सेल्सिअस, नाशिक शहरात ९ पूर्णांक ४ दशांश तर निफाडमध्ये ६ पूर्णांक ७ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काळात तापमान आणखी क...

December 9, 2024 3:52 PM

views 21

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध निवड झाली. हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, त्यांच्याविरोधात अन्य कोणीही उमेदवार नसल्याने हा प्रस्ताव सभागृहाने आवाजी मतदानानं मंजूर केला.    त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांनी तसंच जयंत पाटील  आणि नाना पटोले यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर ...