January 14, 2025 8:55 AM

views 12

राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करणार – मंत्री अशोक उईके

राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करणार असल्याचं, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. प्रत्येक आश्रमशाळा, वसतिगृह हे विभागाच्या सचिवांपासून प्रकल्प अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याला दत्तक देऊन, संबंधितांनी महिन्यातून किमान एकदा प्रत्यक्ष मुक्कामी भेट देत तिथल्या व्यवस्थेची खातरजमा करून घेण्याचे आदेश दिल्याचं, ऊईके यांनी सांगितलं.

January 13, 2025 1:46 PM

views 11

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतल्या डॉकयार्ड इथं नौदलाच्या ३ युद्धनौका आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर राष्ट्राला अर्पण करण्यात येणार आहेत. या ३ युद्धनौका नौदलात सामील होणं हे संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षा क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याच्या दृष्टीनं भारताचं आणखी एक पाऊल आहे. आयएनएस सुरत ही जगातल्या सर्वात मोठ्या आधुनिक विध्वंसक युद्धनौकांपैकी एक आहे. आयएनएस निलगिरीचं डिझाईन भारतीय नौदलाच्...

January 9, 2025 7:23 PM

views 6

राज्यात डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली राबवण्यास सुरुवात

राज्यात अनधिकृत मासेमारी नौकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनच्या सहायानं देखरेख ठेवणारी डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली राबवायला आजपासून सुरुवात झाली. मत्स्यव्यवसाय आणि बंदरमंत्री नितेश राणे यांनी आज मुंबईतल्या आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. मुंबई शहरात ससून गोदी, मुंबई उपनगरात गोराई, ठाण्यात उत्तन, पालघरमध्ये शिरगाव, रायगड जिल्ह्यात वर्सोली आणि श्रीवर्धन, रत्नागिरीत भाट्ये आणि मिरकरवाडा, तसंच सिंधुदुर्गात देवगड, अशा नऊ ठिकाणी ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे.

January 7, 2025 8:09 PM

views 40

राज्यात सर्व वाहनांना टोल भरण्यासाठी फास्ट-टॅग अनिवार्य

राज्यातल्या चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल.  त्याचप्रमाणे रोख रक्कम स्मार्ट कार्ड क्रेडिट डेबिट कार्ड किंवा कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पथकर शुल्क भरायचे असेल तरी देखील दुप्पट पथकर शुल्क भरावे लागेल.    प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि गतीमान करणारी सुधारित महाराष्ट्र शासन कार्यनियमावली प...

January 6, 2025 3:41 PM

views 121

पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून, देशात सर्वाधिक पायाभूत विकासाची कामं राज्यात सुरू आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. राज्यात विविध ठिकाणी महारेलनं उभारलेल्या ७ उड्डाणपुलांचं नागपुरातून लोकार्पण करताना ते बोलत होते.   एका बाजूला केंद्र शासनाचे विविध प्रकल्प आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनानं हाती घेतलेले विविध प्रकल्प यातून समृध्द महाराष्ट्र घडत आहे. येत्या काळात महारेल मार्फत २०० रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाची कामं पूर्ण केली ...

January 3, 2025 7:32 PM

views 13

परदेशी गुंतवणुकीत ‘महाराष्ट्र’ अग्रेसर

परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सातत्याने अग्रेसर राहिला असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये राज्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे ९५ टक्के गुंतवणूक आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीत ही बाब स्पष्ट झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या कालावधीत १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक राज्यात झाली. हे प्रमाण गेल्या चार वर्षातल्या सरासरीच्या ९४ पूर्णांक ७१ शतांश टक्के आहे. महाराष्ट्र...

January 3, 2025 7:42 PM

views 15

पांडुरंगाच्या आशिवार्दानं मोठा विजय प्राप्त झाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पांडुरंगाच्या आशिवार्दानं एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झाला असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आळंदी इथं भेट दिल्यानंतर व्यक्त केली. वारकरी विचारानंच आपला महाराष्ट्र पुढे गेला आहे, भविष्यातही पुढे जात राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. इंद्रायणी नदीचं पाणी शुद्धिकरणाचा कार्यक्रम सुरु केला आहे, तो युद्धपातळीवर पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी बातमीदारांशी बोलताना दिलं.

January 3, 2025 3:15 PM

views 15

दिल्लीत प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीनं मंत्री नितीन गडकरींची प्रकल्पाची घोषणा

राजधानी दिल्ली परिसरातली वाहतूक खोळंब्याची स्थिती सुधारावी तसंच प्रदूषण कमी व्हावं यादृष्टीनं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल एका प्रकल्पाची घोषणा केली. सुमारे साडे बारा हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे दिल्ली-कटरा एक्सप्रेसवे तसंच डेहराडून - द्वारका एक्सप्रेसवे हे रस्ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट जोडले जातील. यामुळे अनेक वाहनांना दिल्ली शहरात येण्याची गरज उरणार नाही.

January 2, 2025 7:03 PM

views 35

मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करण्यासाठी AIचा उपयोग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मंत्रालयात येणारे नागरिक, मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षाही भक्कम रहावी, यासाठी कृत्रिम बुद्धमतेचा उपयोग करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत. मंत्रालयात प्रत्येक मजल्यावर सुरक्षा जाळीचं काम पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

December 31, 2024 8:12 PM

views 18

सहाय्य योजनांचं अनुदान थेट बँक खात्यात वर्ग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

शासनाच्या विशेष सहाय्य योजनांचं अनुदान DBT अर्थात थेट लाभ हस्तांतरण पोर्टलद्वारे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत सामाजिक न्याय, आदिवासी विभागाच्या पुढील शंभर दिवसांच्या आराखड्याचा  मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन आदी  योजनांच्या  अर्थसाहाय्याचं  वितरण या पोर्टल च्या माध्यमातून केलं जाणार आहे. विद...