January 24, 2025 7:29 PM

views 29

प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी महाराष्ट्रतून विशेष पाहुण्यांना आमंत्रण

येत्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात नवी दिल्लीत होणारं संचलन पाहण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. राष्ट्रासाठी महत्वाच्या उपक्रमांमध्ये जनभागीदारी वाढवण्याच्या उद्देशानं  देशभरातून एकूण १० हजार व्यक्तींना आमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे जलदूत, प्राथमिक कृषी पतसंस्थांचे प्रतिनिधी, उत्कृष्ट जल समित्या, स्वयंसहायता गट, कारागीर, विविध योजनांचे लाभार्थी, सरपंच, उत्कृष्ट स्टार्ट अप्स आणि इतर अनेक क्षेत्रातल्या प्रतिनिधींचा  समावेश आहे.  यापैकी ...

January 24, 2025 9:11 AM

views 16

दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे करार

दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे करार. दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रानं जगभरातील विविध दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार केले आहेत; यातून राज्यात 15 लाख 98 हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.   मुख्यमंत्र्यांनी काल दावोसमधून दूरस्थ प्राणलीच्या माध्यमातून वार्ताहरांशी संवाद साधला. उद्योग मंत्री उदय सामंत मुंबईतून सहभागी झाले होते. दावोसमध्ये गुंतवणू...

January 22, 2025 7:46 PM

views 44

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम

मुलींची सुरक्षितता, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला आज दहा वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त येत्या महिला दिनापर्यंत म्हणजेच ८ मार्चपर्यंत दशकपूर्ती अभियान राबवण्यात येणार आहे.  आज  राज्यात ठिकठिकाणी अभियानाचा प्रांरभ करणारे कार्यक्रम झाले.  नाशिक महानगरपालिकेत आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्तांनी उपस्थितांना बेटी बचाव बेटी पढाओ अभियानाची शपथ दिली. धुळ्यात जनजागृती रॅलीने अभियानाला सुरुवात झाली. परभणीतही कार्यक्रम आयोजित झाला होता.

January 22, 2025 6:55 PM

views 15

रिलायन्सचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार

दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेच्या दुसऱ्या दिवशी राज्यात आणखी ३ लाख ५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार झाला. रिलायन्स सोबत झालेल्या या करारातून ३ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यामुळं राज्यानं केलेल्या सामंजस्य करारांचं मूल्य ९ लाख ३० हजार कोटी रुपयांहून अधिक झालं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.    याशिवाय ह्युंदाई, डीपी वर्ल्ड, सिस्को, ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर, NTT DATA या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांश...

January 22, 2025 8:19 PM

views 33

निवडणूक काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्रला पुरस्कार

निवडणूक काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्राला पुरस्कार जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२४-२५ या वर्षासाठी महाराष्ट्रासोबत जम्मू आणि काश्मिर तसंच झारखंडलाही पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना विशेष श्रेणीत पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी, राष्ट्रीय मतदार दिनी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान केले जातील.   राज्यस...

January 19, 2025 7:07 PM

views 12

महाराष्ट्रचा विकास हेच आपलं ध्येय – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्रचा विकास हेच आपलं ध्येय असून त्यापासून तसूभरही मागं हटायचं नाही, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. शिर्डी इथं पक्षाच्या नवसंकल्प शिबिराच्या समारोप सत्रात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व धर्मांचा आदर करणारा आहे, हे कृतीतून दिसावं, हा पक्ष नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचा आहे, हे ठसवण्यासाठी काम करा, असा सल्लाही पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

January 17, 2025 7:03 PM

views 12

१५ फेब्रुवारीनंतर औषध वगळता इतर कुठल्याही खरेदीला मान्यता न देण्याचे वित्त विभागाचे आदेश

चालू आर्थिक वर्षातला निधी खर्च करायचा म्हणून १५ फेब्रुवारी नंतर औषध वगळता इतर कुठल्याही खरेदीला मान्यता देऊ नये, असे आदेश राज्य सरकारच्या वित्त विभागानं सरकारी कार्यालयांना दिले आहेत. संगणक, झेरॉक्स मशीन, फर्निचर दुरुस्ती, कार्यशाळा आयोजन यासारख्या गोष्टी करण्यालाही वित्त विभागानं मनाई केली आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या कालावधीत निधी संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या खरेदीला आळा घालण्यासाठी हे परिपत्रक जारी केलं आहे.

January 16, 2025 6:53 PM

views 8

राज्यातल्या ६ जिल्हापरिषदा आणि ४४ पंचायती समित्यांवर ‘प्रशासक राज’

मुदत संपल्यानं राज्यातल्या सहा जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत  येणाऱ्या एकूण ४४ पंचायती समित्यांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या जिल्हा परिषदांमध्ये नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर यांचा समावेश आहे. या सहा जिल्हा परिषदांच्या अंतर्गत येणाऱ्या ४४ पंचायत समित्यांची मुदतही संपल्याने प्रशासक नेमण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निवडणूक होईपर्यंत प्रशासक म्हणून काम पाहतील. 

January 15, 2025 7:05 PM

views 35

नौदलाच्या २ नौका आणि एका पाणबुडीचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रार्पण

भारत विस्तारवाद नाही, तर विकासवादाच्या दिशेनं काम करत आहे. भारतानं खुल्या, सुरक्षित, समावेशक आणि समृद्ध भारत-प्रशांत क्षेत्राचं नेहमीच समर्थन केलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  ते आज मुंबईत नौदलाच्या गोदीत सुरत आणि नीलगिरी या युद्धनौका, तसंच वाघशीर ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केल्यानंतर बोलत होते. नौदलाच्या ताफ्यात एकाच वेळी एकापेक्षा अधिक युद्धनौका आणि पाणबुडी समाविष्ट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळं भारताची सुरक्षा आणि प्रगतीला नवीन सामर्थ्य मिळेल अ...

January 15, 2025 3:53 PM

views 12

महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार

विजेच्या उपलब्धतेनुसार पुरवठा आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल महापारेषणच्या महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राला गौरवण्यात आलं आहे. ऐरोलीच्या या केंद्राला देशातलं सर्वोत्कृष्ट भार प्रेषण केंद्र आणि ओपन ऍक्सेस या दोन राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं.   इंडिपेंडेन्ट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेनं बेळगावमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. देशभरातल्या  विद्युत कंपन्यांच्या कामगिरीचं  मूल्यमापन करून हे पुरस्कार द...